Saturday, August 31, 2013

हॉटेल

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून
तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्याववर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर
पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये
शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत
झाला . त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच
त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.

ही आहे देशाची परीस्थिती...

पहिला: जादुटोणा, मंत्रबिंत्र झूट असतं सगळं

दुसरा: ह्या, काहितरीच काय.... वेडा आहेस तू

पहिला: अरे, हो... ही बघ शास्त्रीय कारणं...

दुसरा: शास्त्र गेलं तेल लावत, आमचे बुवा म्हणतात की खरं असतं सगळं

पहिला: अरे ते फसवतायत तुला, जरा डोळे उघड

दुसरा: गपे, माझी 'डोळस' श्रद्धा आहे... आमचे बुवा तसे नाहित, सॉलिड पॉवरफुल आहेत...

पहिला: अरे बाबा, असं काही खरंच नसतं, ही घे काही कॉमन सेन्स ची कारणं...

दुसरा: कॉमन सेन्स गेला तेल लावत, आमचे बुवा म्हणतात की हे सगळं खरं असतं...

पहिला: अरे, खरंच हे सगळं थोतांड असतं... तुझ्या भल्यासाठीच सांगतो आहे....

दुसरा: माझं भलं करतोस काय.... थांब.... गोळ्याच घालतो तुला...

ही आहे देशाची परीस्थिती...

Friday, August 30, 2013

मोबाईल मेरीज ब्युरो

संस्थाचालक : आम्ही ' मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय …
.
.
.
लग्नस्थळासाठी 1 दाबा,
..........
.
.
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
.
.
.
लग्नासाठी 3 दाबा,
.
.
.
चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
.
.
.
संस्थाचालक : दुसऱ्या लग्नासाठी पहिलीचा गळा दाबा

Thursday, August 29, 2013

कॉपी की कॉफी

पक्या ; एक कॉफी केवढ्याला?
वेटर : पन्नास रुपये साहेब !
पक्या : गपे ! समोरच्या दुकानात पन्नास पैशाला आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वेटर : ते झेरॉक्सचं दुकान आहे !

Wednesday, August 28, 2013

बिल

जोक समजतोय का बघा.
८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता..
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
...
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते...
मी कशाला घराचा फोन वापरू...?
...
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय...
मी कशाला घराचा फोन वापरू...
...
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस??

Tuesday, August 27, 2013

प्रॉमिस

वधु : थांबा...!!! अज्जिबात जवळ येऊ नका .. मला स्पर्श सुद्धा करू नका !!
.
वर : पण का ??? काय झालं?
.
वधु : मी आईला प्रॉमिस केलं आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नानंतर हे सर्व बंद करेन म्हणून.... 

Monday, August 26, 2013

कै च्या कै

आत्ताच हसून घ्या नंतर हसायला येणार नाही
.
.
.
.
एका पेरूच्या झाडावर १० आंबे आहेत.
त्यातले ५ चिकु मी काढून घेतले. तर त्या झाडावर किती मोसंबी शिल्लक राहतील?
.
.
.
.
.
.
विद्यार्थीः १० हत्ती.
सरः वा,तू बरोबर कसे ओळखलेस?
.
.
.
.
.
विद्यार्थीः कारण मी डब्यात मेथीचीच भाजी आणलीय. .
.
.
.
.
.
तात्पर्य: रोज ब्रश करा नाहीतर घरात उंदीर येतात..........

Sunday, August 25, 2013

मराठी मुली लग्न का करतात ?

मराठी मुली लग्न का करतात ?

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी....?

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......?

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........?

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी.....?

5) आई-बापावर दया करण्यासाठी.....?

6) मैत्रिणीने केले मग मी का नको...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून.........?

8 ) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून.........?

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार.......?

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी......?

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे , फेअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय ???

Saturday, August 24, 2013

झम्प्याचे शॉपिंग

झंप्या कोल्डड्रिंकच्या दुकानात गेला.

झंप्या - ओ...एक पेप्सीची बॉटल उघडा. 
दुकानदार उघडतो.

झंप्या - एक लिम्काची बॉटल उघडा. 
दुकानदार उघडतो.

झंप्या - एक कोकाकोलाची बॉटल उघडा.
दुकानदार उघडतो.

झंप्या - एक मिरिंडाची बॉटल उघडा.

दुकानदार - ( वैतागून) ए...किती बाटल्या उघडायला लावतोयस ? तुला नक्की काय प्यायचंय ते सांग ना ?

झंप्या - अरे यार...प्यायचं तर काहीच नाही. मला ना , तो बॉटल उघडण्याचा आवाज खूप आवडतो (फस्स...फस्स)

Friday, August 23, 2013

मच्छर

तीन मच्छर आपापसात बोलत होते.
.
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.
.
.
.
.
.
.
.
.
.२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.
.
.
.
.
.
..
.
.
.3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,
.
.
.
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.
.
.
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला...
आख्ख्या करीअरची वाट लावली..

Thursday, August 22, 2013

शोध

या दशकातील सर्वात मोठा जोक....
.
.
.
.
.
.
.
.
कम्प्युटर आणि मोबाईल चा शोध लावला आहे तो आपल्या वेळेची बचत करण्यासाठी 



Wednesday, August 21, 2013

सोलिड इन्सट .

झंप्या त्याच्या प्रेयसीलाविचारतो ...
झंप्या - प्रिये तू फेअरनेसक्रीम कोणती वापरते ...?????
.
.
.
प्रेयसी - ( खुश होऊन ) - कोणतीच तर नाही .....!!!
.
.
.
.
झंप्या - अग मग युज करत जा ना ...
काळी हडळ कुठली ....
नेहमी घाबरवते ..

Tuesday, August 20, 2013

स्पर्धा परीक्षा

एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला..
ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं
होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप
करायला सुरुवात केली..
हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’
आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..
सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन
कॉईन फ्लिप करतच होता.
सर- हे काय करतोय?
चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत
कि नाही.

Monday, August 19, 2013

पु.ल.

एकदा पुलंचे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,
.
.
.
.
" आता मला कळले कि,
.
.
.
.
पायांना पाव का म्हणतात ते ! 

Sunday, August 18, 2013

टाळ्या वाजवणारे मृतात्मे: अमेरिकन बहिणींची बुवाबाजी


जगाच्या पाठीवर सर्वत्र मृतात्म्यांच्या अस्तित्वाला विविध धर्मांत मान्यता आहे. हे आत्मे विविध रुपात भटकत असतात असा समज आहे. विज्ञानात आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तरीही एका मानसिक गरजेपोटी माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाला सहन करत नाही व त्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या तथाकथित आत्म्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ लागलेली असते. या मानसिकतेचा फायदा घेऊन नसलेल्या आत्म्याशी संवाद साधून देणारे दलाल जागोजागी जगभर दिसतात. अमेरिकाही याला अपवाद नाही. १९४८ मध्ये न्यूयॉर्कमधून आत्म्याशी संवाद साधण्याची बुवाबाजी दोन चलाख भगिनींनी सुरु केली. या बुवाबाजीचा पर्दाफाश कसा झाला हे जाणून घेणे जितके मनोरंजक तितकेच प्रबोधन करणारे ठरेल.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील हाईड्सव्हिले हे एक उपनगर. जॉन फॉक्स नावाच्या लोहाराचे कुटुंब येथे राहत होते. या कुटुंबात एकूण पाच सभासद होते. जॉन फॉक्स, त्याची पत्नी व मार्गारेट(मॅगी), कॅथेरीन (कॅथी) आणि ली फिश या त्यांच्या मुली.
मार्गारेट आठ वर्षांची व कॅथेरीन साडे सहा वर्षांची असतानाची ही घटना. या दोघी बहिणी मोठ्या खोडकर होत्या. त्यांची आई मात्र प्रेमळ व सरळ मनाची पण भित्र्या स्वभावाची होती. या स्वभावाचा फायदा घेऊन या खोडकर पोरी आईला घाबरवण्याचे विविध उद्योग करीत असत. बेडवर झोपायला जाताना दोघी बहिणी एक सफरचंद दोरीला बांधून ती दोरी वरून खाली जमिनीवर टाकून आपटल्याचा आवाज काढीत. आईने हा आवाज बऱ्याचदा ऐकला पण तिला आवाज कशामुळे येतोय हे कळायचे नाही. कॅथी व मॅगी तशा लहानच. त्यामुळे त्या हा चावटपणा करत असतील अशी पुसट शंकाही तिला आली नाही.
अखेरीस तिने हा गूढ प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. आपली आई व शेजारी या गूढ आवाजावर विश्वास ठेवतात हे लक्षात येताच दोघी बहिणींनी पायाची बोटे लाकडी जमिनीवर खुबीने वाकवून वेगळेच आवाज काढायची नाटके सुरु केली.
हे आवाज आपण कसे काढीत असू हे पुढे मॅगीने उघड केले. तिने दिलेला कबुली जबाब असा, “माझी बहीण कॅटी हिला हाताची बोटे मोडण्यातून आवाज निघतो हे माहित होते. तसाच आवाज पायाची बोटे जमिनीवर मोडून काढता येईल हे तिच्या लक्षात आले. मग आम्ही दोघींनी एका पायाची बोटे वापरून असा आवाज काढण्याचा सराव केला. नंतर दोन्ही पायाच्या बोटाने असा आवाज काढण्याचा सराव केला आणि अंधारात असा बेमालूम आवाज काढण्याचे कौशल्य आम्ही प्राप्त केले.”
पायाची बोटे लाकडी जमिनीवर मोडून टाळीसारखा आवाज निघे. या आवाजाचा वापर करून या बहिणींनी न्यूयॉर्कमध्ये व नंतर सर्व अमेरिकेत एका नव्या बुवाबाजीची सुरुवात केली. अमेरिकेत मृतात्म्याशी संवाद करण्याचे दरबार या दोघींनी सुरु केले. १९४८ मध्ये या नाट्याला सुरुवात झाली.
मॅगी व कॅथी यांनी असा दावा करायला सुरुवात केली की आपल्या बेडरूममधून विचित्र आवाज येत आहेत. हे आवाज एका खून झालेल्या फेरीवाल्याच्या आत्म्याचे होत असे सांगायला त्यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसांनी या दोघींच्या आईला याबाबतची खात्री देणारा अनुभवच आला. हा अनुभव तिने स्वतःच्या सहीने प्रसिद्धीस दिला. ती वेळ होती ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतरची. म्हणजेच एप्रिल फूलचा दिवस. मॅगी व  कॅटीने सगळ्या अमेरिकेला एप्रिलफूल करण्याची ती सुरुवात होती. मॅगीच्या आईने हा अनुभव खालीलप्रमाणे वर्णन केला.
कॅटी मोठ्याने म्हणाली, “मि. स्प्लिटफूट (खुन्याचा आत्मा) मी जसं करते तसं तू कर.” मग तिने टाळ्या वाजवल्या. लगेच तेवढ्याच टाळ्या कुठूनतरी वाजल्या. मोठे गूढच झाले. नंतर मॅगी उद्गारली, “आता मी करते ते कर; मोज एक, दोन, तीन आणि चार.” तशा चार टाळ्या तिने वाजविल्या आणि आश्चर्य म्हणजे तशाच चार टाळ्या प्रतिसादादाखल वाजल्या.
नतंर फेरीवाल्याच्या आत्म्याने अशा प्रतिसादाद्वारे संदेश दिला की, त्याचा खून झालाय व त्याचे प्रेत तळघरात पुरलंय. पण याची शहानिशा करण्यासाठी ते तळघर खणल्यावर तेथे थोडी हाडेच सापडली. मात्र ही हाडे कोण्यातरी प्राण्याची असावीत माणसाची नव्हे असा निष्कर्ष निघाला.
काही दिवसातच लोकांपर्यंत बातम्या पोचल्या की, या मुली केवळ त्या फेरीवाल्याच्या आत्म्याची माहिती देत नाहीत तर अशा भटकणाऱ्या वा खितपत पडलेल्या अनेक आत्म्यांच्या शोधासाठी मदत करतात. त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकांची एवढी ख्याती झाली की, या मुलींची थोरली बहीण ली फिश हिने मृतात्मावादी सोसायटीची स्थापना घोषित केली. याच्या प्रसाराला धर्माचे स्वरूप आले. आणि मृतात्म्याच्या दरबारात सुरुवातीला व शेवटी धार्मिक प्रार्थना म्हणायला सुरुवात झाली.
न्यूयॉर्क शहरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर ली फिशने या दोघींना घेऊन संपूर्ण अमेरिकेतील विविध शहरामधून मृतात्म्याशी बोलण्याचे दरबार भरविण्याची मोहीम सुरु केली. प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधण्यास मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले.
या गोष्टीचा असा बोलबाला झाल्यावर अमेरिकेतील विवेकवादी मंडली जागी झाली. चिकित्सक संशोधकांनी मॅगी व कॅटीला आव्हान देण्यास सुरुवात केली. बफेलो विद्यापीठातील प्राध्यापकांनी या मुलींना मिळणारे आत्म्यांचे गूढ आवाज तपासले. संशोधनांती हे गूढ आवाज आत्म्याचे नसून या मुलींच्या सांध्यांतून मुद्दामहून काढलेले असावेत असा निष्कर्ष काढला. नंतरच्या संशोधनात असे आढळले की, हे आत्मे अनेकदा चुकीची उत्तरे देत आहेत. मॅगीच्या पायाची हालचाल नियंत्रित केल्यावर असे गूढ आवाज येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला.
चलाख मंडळी आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप होऊन त्याची जाहीर कबुली सहसा देत नाहीत. आपण इतरांना फसवले हे कोण सांगेल? ते लपवून ठेवण्यातच शहाणपणा दाखविण्याची प्रवृत्ती बहुतेक मंडळींची असते. पण कॅटी आणि मॅगीच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही लोकांना फसवीत होतो याची जाहीर कबुली त्यांनी दिली. पण ती चाळीस वर्षांनी. त्यांच्या दरबाराची सुरुवात झाली १९४८ मध्ये व जाहीर कबुली दिली २१ ऑक्टोबर १९८८ मध्ये. त्या दिवशी या भगिनी न्यूयॉर्कमधील संगीत अकादमीच्या हॉलमध्ये दाखल झाल्या. आम्ही चलाखीने मृतात्म्याचे आवाज कसे काढत होतो याचे प्रात्यक्षिक मार्गारेट दाखवू लागली आणि कॅथरीन मान डोलावून त्यास होकार देत होती. गंमत म्हणजे या कार्यक्रमास जमलेल्या मंडळीत आत्म्याचे अस्तित्व मानणारे बहुसंख्येने होते. त्यांना धक्काच बसला व ते भुवया उंचावून स्टेजवरील प्रात्याक्षिके खोटी आहेत असा नकारात्मक सूर काढू लागले व आपली नाराजी प्रकट करू लागले. मृतात्म्यांचे टाळीसारखे आवाज मार्गारेट पायातील बूट चलाखीने काढून, पायाची बोटे वाकवून कशी काढत होती ते स्पष्टपणे दाखवीत होती. मोजे घातलेला पाय पातळ अशा लाकडी फळीवर कौशल्याने आपटून ती आत्म्याचा गूढ अवाज काढत होती. आणि हे ती सर्वांसमोर दाखवीत होती.
इव्हनिंस पोस्ट या दैनिकाने दुसऱ्या दिवशी या प्रयोगावर बातमी दिली. “मिसेस मार्गारेट आता आधुनिक मृतात्मावादाचा उगम तिच्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे दाखवीत आहे.” मार्गारेटने स्वतः याबाबत खालील निवेदन जाहीर केले.
“हीच वेळ आहे की, आता मला मृत्यूनंतरचे जग व एकूणच अध्यात्मवादाबाबतच्या या विषयाबाबतचे सत्य उघड करायला हवे. हा विषय आता जगभर पसरला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला नाही तर त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या क्षेत्रात मी प्रथम प्रवेश केला आणि म्हणून तो उघड करण्याचा हक्क मलाच आहे.”
पुढे मग लहानपणी आईच्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेऊन तिच्या खोड्या कशा काढत असू हे मार्गारेटने विस्ताराने आपल्या निवेदनात कथन केले. ज्याची माहिती या लेखाच्या सुरवातीस आली आहे. या निवेदनात मार्गारेटने पुढे लिहिले आहे की,
तिची थोरली बहिण ली फिश हिला माहित होते की, मृतात्म्यांच्या टाळीचा आवाज हा बनावट होता आणि जेव्हा तिने दोघी बहिणीबरोबर अमेरिकेचा दौरा केला तेव्हा लोकांच्या प्रिय मृतात्म्यांच्या प्रश्नांची उत्तरे तीच त्यांना सुचवित असे. यासाठी ती दरबारात आलेल्या लोकांकडून अगोदरच माहिती मिळवीत असावी आणि अशी माहिती मिळत नसेल तेव्हा या क्षेत्रातील चाणाक्ष लोक संदिग्ध उत्तर देण्याचे जे कौशल्य वापरतात तेच त्या वापरत असाव्यात.
मार्गारेट आणि तिच्या बहिणींचे हे मृतात्मानाट्य आणखीनच वेगळ्या प्रकारे रंगत गेले. या भगिनींची अशी अटकळ होती की, आपल्या सत्य कथनाबद्दल लोक आपली स्तुती करतील व निर्भयपणाला दाद देतील. शेवटी माणूस पैशाचा गुलाम असतो हेच खरे. पूर्वी दरबारात चलाखी करून पैसा मिळे, पण आता खरे लोकांना सांगितले तर लोक खूश होऊन अधिक बक्षीस देतील अशी त्यांची अटकळ होती. पण घडले उलटेच. आपण मृतात्म्यांचा आवाज चलाखीने काढत होतो याचे प्रयोग त्यांनी लोकांसमोर सुरु केले. त्याला खुश होऊन लोक आर्थिक मदत करतील ही मार्गारेटची अपेक्षा फोल ठरली. चरितार्थ चालवणे त्यामुळे कठीण झाले. तिला जाणीव झाली की, लोक फसण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात पण शहाणे होण्यासाठी नाही करत.
परिणामी मार्गारेट परत आपल्या मूळ मृतात्मा संवाद दरबाराकडे वळली याचे आश्चर्य वाटायला नको. ८ मार्च १९९५ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या शोकयात्रेसाठी हजारो अध्यात्मवादी (मृत्यूनंतर आत्मा असतो असे मानणारे) जमले होते व शोक व्यक्त करीत होते.
आजही मृतात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेली ही मंडळी मार्गारेटने कबूल केलेला अपराध हा खोटा असल्याचे सांगतात. तिच्या पैशाच्या गरजेपोटी किंवा या क्षेत्रातील इतर स्पर्धकांवर सूड उगवण्यासाठी तिने हे ढोंग केले असावे असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि पुढे तिच्या बहिणीने, ती चलाखीच करत होती याला पुष्टी दिली आणि ही चलाखी त्या दोघी कशा करत होत्या याची प्रात्याक्षिके दाखवण्याचे कार्यक्रम परत परत केले.
मार्गारेट व तिच्या बहिणींचा अमेरिकेतील हा आत्म्याचा खेळ मानवी स्वभावाचे अनेक पैलू दाखवतो. माणसांना सत्य पचवणे किती जड जाते व सुप्त इच्छांच्या पूर्तीसाठी आभासी जग त्यांना खरं वाटू लागतं. या आभासी जगाचे दर्शन चलाख मंडळी करतात हे त्यांना हवहवसं वाटतं. आपली फसवणूक होत आहे हे दिसल्यावर देखील लोक ते मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणूनच जेम्स रँडीनं म्हटलंय, “लोकांना फसण्याची भारी हौस असते. म्हणून त्यांना फसवणे सोपे जाते.”
विवेकाची वाट किती अवघड आहे नाही का?
-प्रा. प. रा. आर्डे

गैरसमज

आजच्या काळात शिक्षकांचा सर्वात मोठा गैरसमज.......!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विध्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढणे ही शिक्षा आहे!!!

Saturday, August 17, 2013

आईडिया

पोरगी पटली की नाही हे ओळखायचं कसं?
.
..
...
तिच्यामागून गुपचूप जा. ''भौ...'' करून
तिला घाबरवा....
.
..
ती नंतर हसली, तर समजा पटली...
.
.
.
...... आणि संतापली, तर लगेच म्हणा..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
...'' दिदी घाबरली!!!!!''
खि खि खि खि....



Friday, August 16, 2013

ब्युटी पार्लर

मुलगी : कशी दीसतेय मी आज..
आत्ताच ब्युटी पार्लर ला जाऊन आले .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग ..???
आज पण बंद होते का??

Thursday, August 15, 2013

स्पेलिंग

गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एका मुलीला धक्का लागला. कुशाभाऊं : sorry मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का? कुशाभाऊं घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत): इट्स ओके. कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?

Wednesday, August 14, 2013

हृद्य

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं,"प्रेम काय आहे???"
.
.
.
.
.
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
.
.
.
.
"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू...."

Tuesday, August 13, 2013

कृतज्ञता

नवर्याने रात्री उशिरा बायकोला एसएमएस
केला
तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य
धन्य झाले...
माझ्यासारख्या नवर्याला सांभाळून
घेतल्याबद्दल धन्यवाद...
तू महान आहेस...
बायकोचे उत्तर आले...
.
.
.
..
..
किती पेग झाले.

Monday, August 12, 2013

लव

मास्तर :- पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे
का...??
विद्यार्थी :- (एकाच आवाजात)नाही सर.
मास्तर:- जाणून घ्यायचे आहेकाय?
विद्यार्थी :- होय सर...
:
:
:
:
... : :
:
:
:
:
: मास्तर :- मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील
रामाचा पुत्र
होता.
अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा...

इज्जत चा भाजीपाला .

मुलगा - तु किती वाजता उठतेस ?.
.
.
.
मुलगी- माझ्या मनावर मी केव्हा पण
झोपते ,आणि केव्हा पण उठते
.
.
.
मुलगा- अरे वा !
तुझ्या सवयी माझ्या कुत्र्या सारख्या आहेत....

Sunday, August 11, 2013

कुत्रा

एकदा बंड्या इंग्लिश केसाल
कुत्र्याला घेवून
फिरायला जातो.
शेजारच्या काकू:-किती गोड
कुत्रा आहे हा.. (असे
म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू
लागतात…)
बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या.
काकू = अरे थांब मला याच्या खूप
पाप्या घेऊ दे खूप
गोड कुत्रा आहे.
(जरा वेळाने पापी घेऊन
झाल्यावर….)
काकू = आता बोल.
बंड्या = अहो त्याचे तोंड
दुसऱ्या बाजूला आहे..



Saturday, August 10, 2013

टपोरी

मुलगी: (मंदिरात आजुबाजुला बघून)
देवा मला माझ्यासाठी काहीच मागायचे
नाहीय… . . . .
फ़क्त.. . . . .
माझ्या आईला चांगला जावई मिळू दे .

च्या आईला ह्या मुली देवा ला पण टोपी घालायला मागे पुढे नाय पाहणार

खि खि खि खि

एक मुलगी चेहर्यावर रुमाल बांधूनबसस्टाँप वर
उभी असते.
.
तेवढ्यात एक माणुस बाईक ने येतो आणि म्हणतो
.
आति क्या खंडाला
.
.
.
.
.
.
मुलगी : अहो पप्पा मी आहे, पिँकी...

ओय तिच्या

खि खि खि खि

Friday, August 9, 2013

गाणे

लग्नाच्या पहिल्या दिवशी बायको प्रेमाने म्हणते नवऱ्याला.. "धनी मी तुम्हासनी लई आवडले ना... मंग गान म्हणा कि एखाद माह्यासाठी प्रिमान".

नवरा : "बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला ...फुलला"...
:
:
:
:
:
:
:
:

लग्नाच्या दहा वर्षांनी बायको परत म्हणते : "अहोहोहोहोहो ऐकल का ( कदाचित दादागिरीने बोलत असेल ) ते गान म्हणा कि धनी जे तुम्ही लग्नाच्या पहिल्या रातच्याला माझासाठी म्हणला व्हता"....

नवरा : "बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुगला.... फुगला"...:-))))))

Thursday, August 8, 2013

सर्कस

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही.
त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून
३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो
“अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस ? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १००रुपये आणी पाहिज...े तेव्हढे जेवण मिळेल.
मग पैलवान त्याच्याबरोबरzoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते.
असाच एका दिवशी ,तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो.
त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो,
सिंह त्याच्या जवळ आलेला असतो ,तो
गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो
“गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

Tuesday, August 6, 2013

वाद

बायकांशी वाद घालायचा म्हणजे । ,
,
,
,
,
, ,
,
,
,
,
, स्वतच्या गालावरचा डास मारण्यासारखे आहे .
. .
.
.
.
. .
डास मरेल कि नाही, माहित नाही पण चापट पडणारच 

Monday, August 5, 2013

उपाय

मन्या : दिन्या हा घे पेढा
दिन्या : का रे ¿
मन्या : आरे मला मुलगी झाली
दिन्या : पण मोठी झाल्यावर सगळे पोर
तिला छेडणार
मन्या : त्यावर पण मन्या भाईने ऊपाय काढलाय
दिन्या : काय ¿
.
.
.
.
.
.
.
मन्या : तिच नाव मी दिदी ठेवलय..

Sunday, August 4, 2013

संताची लव्ह स्टोरी

संताला रस्त्यावर 500 रुपयांची नोट सापडते
.
.
त्या नोटवर I LOVE YOU...लिहिलेले असते...
.
.
संता लाजून ती नोट उचलतो
.
.
आणि त्यावर लिहितो
I LOVE YOU TOO...
.
.
आणि शेवटी नोट त्याच ठिकाणी ठेवून निघून जातो.... 




Saturday, August 3, 2013

कोंबडी

कोंबडीवर ४ शब्द ...

१. मला सगळेच प्राणी आणि पक्षि आवडतात . प्राणी खूप चविष्ट असतात . "कोंबडी" विशेषतः जास्त चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षि आहे.
२. कोंबडी खाल्ल्याने "बर्ड फ्लू" होतो.
३. कोंबडी "शाकाहारी " आहे , म्हणून मला तिचा आदर वाटतो .
४. कोंबडीला दगड मारला तर तिचा 'पक पकाक' असा आवाज येतो. मला तो फार आवडतो. नाना पाटेकरचा एक सिनेमाचे नाव 'पक पक पकाक ' असा आहे .
५. पूर्वीचे लोक कोंबड्या चोरत ,त्यांना कोंबडी चोर असे म्हणत,चोरी करणे गुन्हा आहे.
६. कोंबडी "अंडे" देते, प्रत्येक कोंबडीला नेहमीच जुळी (ट्विन्स) अंडी होतात...
७. कोंबडीचा बळी देतात. बळी देणे हि प्रथा वाईट आहे असे, "आदित्य" काल 'चीकेन तंदुरी' खातांना म्हणाला.

८. पूर्वी 'कोंबडा' आरवायचा आणि 'कोंबडी' झोपून असायची,,,,(आळशी कुठली )
९. कोंबडी कधी कधी 'सोन्या' चे अंडे देते. मला घरी लाडाने 'सोन्या' हाक मारतात .
गटारी चा दिवशीचा चार ओळी - कोंबडीच्या हातात हात घालून बोकड लागले नाचू, आषाढ गेला श्रावण आला आता महिनाभर तरी वाचू !! 

Friday, August 2, 2013

जेवणाची वेळ

चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून
किती चरशील?
.
.
. .
.
.
.
.
. .
.
चम्प्या – अबे मी पण परेशानझालोय..अजूनतीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…७ ते ११.

Thursday, August 1, 2013

तंबू

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.

वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.

ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?

मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..

( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )