Thursday, November 28, 2013

गुरुजींची ख़ुशी

गावातल्या शाळेतील चिडके शिक्षक वर्गात आले. नेहमीप्रमाणे त्यांनी टेबलावर डसटर आपटले. 
"शांत बसा", अशी गर्जना केली. वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले, 
"मु ऽऽ लां ऽऽ नो आज मी खूप खूप खुश आहे.सांगा बरे कशामुळे? "
पोरं एका सुरात म्हणाली, "सर कशामुळे?" 
सर म्हणाले, "ओळखा पाहू?" 
पोरे एका स्वरात म्हणाली, "आम्ही नाही, तुम्हीच सांगा."
सर आढेवेढे घेत म्हणाले," अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला."

पोरांनी टाळ्या वाजवल्या.खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला.
प्रश्न केला, " ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?"
पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली.

तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारट बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं,

"खरवस...!!!"

Tuesday, November 26, 2013

बायका

बंड्याच्या पायाचा हाड तुटला होता...
.
तो हॉस्पिटल मध्ये गेला तर
तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड तुटलेली होती
.
बंड्याने कुतूहलतेने विचारले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुम्हाला २ बायका आहेत का....?"

Thursday, November 21, 2013

गाय

सरांनी वर्गात मुलांना सांगितलं
'' उद्या येताना 'गाय' या विषयावर निबंध लिहून आणा...''

मग वाचा आपल्या 'गणप्या' ने लिहलेला निबंध

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.

गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.

पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय!!!!

Monday, November 18, 2013

बोलण्याचा विषय

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फोन वर...

बॉयफ्रेंड : आज जेवणात काय खाल्लं??

गर्लफ्रेंड : तुला नं फक्त एवढच बोलता येतं...दुसरं काही येतच नाही!!

बॉयफ्रेंड : जाऊदे...मला सांग दिवसा एवढा गोंगाट असताना आकाशातून जाणार्‍या विमानाचा आवाज आपल्याला ऐकू येतो....पण रात्री शांततेत तो आवाज ऐकू नाही येत.....कसं काय ग???

गर्लफ्रेंड : मी ना...आज वांग्याची भाजी,चपाती आणि भात खाल्ला

Thursday, November 14, 2013

अत्रेंचा विनोद

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद सुरू होता.

कुणीतरी अत्र्यांना म्हटलं, " अहो ते कर्नाटकवाले
म्हणताहेत की बेळगाव आमचं आहे. 

कारण "बेळगाव"
नावातली पहिली दोन अक्षरे म्हणजे "बेळ" हा म्हणे
कानडी भाषेतला शब्द आहे."
.
.
.
.
.
.
अत्रे म्हणाले, " ते मूर्ख आहेत. असं दोन अक्षरांवरून ठरत
असतं, तर आम्ही उद्या लंडन आमचं आहे असं म्हणू".

Thursday, November 7, 2013

रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे.
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो.

Tuesday, November 5, 2013

रेल्वे

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून आजुबाजूच्या शेतातून
धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.
रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते.
रेल्वे चालक संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात
आणि त्याला प्रश्न विचारतात.
अधिकारी- संता, तू असे का केलेस..??
संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.
मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून बाजूला जात
नव्हता.
अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..?? एका माणसासाठी तू
हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात
घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??
संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय करणार..?

Sunday, November 3, 2013

बापाला न कळता

एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी फोन लावतो...
तिचे वडील फोन उचलतात..
मुलगा मनात म्हणतो.. हे भगवान हा रावण कुठून
आला..
वडील : हेल्लो, कोण बोलताय ?
मुलगा : मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ "कौन बनेगा करोड़पति" से ओर
आपकी बेटी की फ्रेंड हॉट सीट पर बेठी है ओर
आपकी बेटी की मदद चाहती है, उसको फोन दीजिये
सर,
वडील : ओह, आश्चर्यचकित होऊन मुलीला फोन
देतात मुलगा : सवाल यह "आज शाम को तुम
कहाँ मिलोगी ?"
Option A : सारसबाग
Option B : झेड ब्रिज
Option C : कोरेगओन पार्क
Option D : पुणे सेन्ट्रल मॉल मुलगी : "Option B"
मुलगा : धन्यवाद, ओर अब आप का समय समाप्त
होता है....


Saturday, November 2, 2013

रक्ताची गरज

बंड्या : Sister मला1
Bottle रक्त मिळेल का ?

nurse : हो मिळेल की सर तुमचा Blood Group सांगा ?

बंड्या : द्या कोनता पण चालेल मला
Nurse : असे कसं हो सर कसे काय चालेल कोणता पण!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. .
. .
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : Girlfrnd ला love
letter लिहायचयं बाई समजुन घेत जा