Sunday, July 6, 2025

टाईमपास

 बोअर होत असेल तर करण्यासारख्या १३ मनोरंजक गोष्टी...


१. Random customer care ला फोन करा.

२. गच्चीवरून रस्त्यावर पाण्याचे फुगे टाका

३. शेजाऱ्यांची बेल वाजवून पळून जा

४. झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर भुंका

५. भर गर्दीत राजू sss अशी बेंबीच्या देठापासून बोंब ठोका आणि किती जण वळून बघतात ते मोजा 

६. मंडईत जाऊन उगाच क्विंटलचे भाव विचारून या

७. कागदाची विमाने करून गच्चीतून खाली सोडा

८. रेनकोट घालून शॉवर खाली उभे रहा

९. असंबद्ध मेसेज मित्राला/मैत्रिणीला करा.

१०. ज्याला त्याला miss call द्या

११. चिंचोके फरशीवर घासून लोकांना चटके द्या

१२. बहिर्गोल भिंगाने सूर्यप्रकाशात लोकांना चटके द्या

१३. झोपा

Sunday, June 1, 2025

व्यायाम

 पुण्याच्या जिममधली पाटी. 'व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे' 

.

.

.

.

.

.

.

.

.

 'व्यायाम करावा लागतो तो आपोआप होत नसतो' 

😆🤣😋😉

Saturday, May 31, 2025

ऑपरेशन

 गण्या: काका, कालच माझ्या कानाचं ऑपरेशन झालं नवा कान बसवला मला

.

.

.

.

.

 काका: हो का. अरे वा, हॅपी न्यू इयर ! 

😆🤣😋😉

Sunday, May 18, 2025

नकाराचे कारण

 प्रेम करत नाही तर स्पष्टपणे नकार द्यायचा ना......


"जर मी तुझ्याशी लग्न केले तर मुलेही काळी होतील"


असे म्हणण्याची काय गरज होती?

😜😂😁😝

Tuesday, March 18, 2025

अर्थाचा अनर्थ

 माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..

खुप गप्पांनंतर ती मला म्हणाली
_"माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं वाकडं आहे."_
मी म्हणालो - _"माझ सरळ आहे "_😳
च्यायला भडकली ना जाम माझ्यावर!
😂😂😂😂