Wednesday, October 30, 2013

लस्सी

संता समुद्रात दही टाकत होता..

बंता ने ते पाहिल आणि विचारल, "हे काय करतोय??"

संता : लस्सी बनवतोय..

बंता : तू वेडा झालास का??
तुझ्या अश्या वागण्याने लोक आपल्याला मंद समजतात..
.
.
.
.
.
.
आता एवढी सारी लस्सी पिणार कोण??



Monday, October 28, 2013

जादू

चम्प्या आणि झंप्या एकदा चॉकलेट च्या दुकानात गेले..

खूप गर्दी पाहून झाम्प्याने ३ चॉकलेट चोरले..

बाहेर आल्यावर

झंप्या - मी किती शातीर आहे पाहिलंस?
मी ३ चॉकलेट चोरलेत..

चम्प्या - मी तुला एक जादू दाखवतो..

चम्प्या दुकानदाराजवळ जातो आणि म्हणतो

चम्प्या - भाऊ...तुम्हाला जादू दाखवू का?

दुकानदार - दाखव कि..

चम्प्या - मला एक चॉकलेट द्या..
(दुकानदार चॉकलेट देतो..आणि झंप्या खाऊन टाकतो.)

चम्प्या - अजून एक चॉकलेट द्या..
(दुकानदार चॉकलेट देतो..आणि चम्प्या खाऊन टाकतो)

असे करत चम्प्या ३ चॉकलेट खातो..

दुकानदार - जादू कुठाय यात?

चम्प्या - आता तुम्हाला ३ चॉकलेट झाम्प्याच्या खिश्यात भेटतील...

चम्प्या रॉक्स...झंप्या शॉक्स


Friday, October 25, 2013

पार्टी

एका बेवड्या ने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून
बकरा चोरि करायचा ठरवले
आणि बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली

सकाळी जेव्हा घरी आला तर
बघतोय काय ?

बकरा जिवंत

आपल्या बायकोला विचारतो :-
हा बकरा ईथे कसा

बायको :- बकरा गेला खड्यात
तुम्हि पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन
कुत्रीला कुठे घेऊन गेले ?

Monday, October 21, 2013

अपेक्षा

मुलासाठी मुलगी बघण्याच्या वेळेस सासू च्या मागण्या - 




मुलगी सुंदर असावी 

श्रीमंत असावी . 

सुशिक्षित असावी . 
.
घरातील सर्व कामकाज यावे.
.
.
.
.
मुलीच्या मागण्या -
.
" सासूबाई फोटोमध्ये असाव्यात " 

Sunday, October 20, 2013

प्रश्नोत्तरे

प्रश्न :- "लग्न" हा स्वर्गाचा दरवाजा आहे?
उत्तर :- होय. पण बाहेर जाण्याचा..!!

प्रश्न :- भांडणात एका बायकोबरोबर कोणी जिंकू शकतं का?
उत्तर :- होय.
प्रश्न :- कोण?
उत्तर :- दूसरी बायको..!!

प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!

प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.

प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.

Friday, October 18, 2013

हितचिंतक

काय साली जिंदगी आहे.....

डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे....

पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा....

वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात
अडकावे....

अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे....
.
.
.
.
.
फक्त आणि फक्त एका चोरालाच वाटते की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे

Tuesday, October 15, 2013

प्रेमासाठी काहीही?

पुणेरी boyfriend -
मुलगा: I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk
on fire just for you.
मुलगी: wow किती romantic...! तू मला आत्ता भेटायला येशील का?
मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल

Monday, October 14, 2013

चम्प्याचे लग्न

झंप्या : कारे चंप्या तु
त्या चिंगीसोबतचं तुझं लग्न
का मोडलं,

किती चांगली मुलगी होती ती...

चंप्या : अरे तुला काय सांगु
मित्रा, तिला एकपण बॉयफ्रेंड
नव्हता...

झंप्या : मग ही तर चांगलीच गोष्ट
आहे की...

चंप्या : कसला डोंबल्याची चांगली गोष्ट,
जी आजपर्यंत कोणाचीच होऊ
शकली नाही ती माझी काय
होणार....

Thursday, October 10, 2013

बहीण

तात्यासाहेब:-बाळू काल तुझ्याबरोबर होती , ती तुझी नातेवाईक आहे का?

बाळू:- होय ती माझी लांबची बहिण आहे.

तात्यासाहेब:-लांबची म्हणजे?
.
.
.
.

बाळू:-आम्ही एकूण १४ भावंड आहोत.

मी सर्वात मोठा आणि ती सर्वात लहान. 



Wednesday, October 9, 2013

पुणेरी विनोद

पुणेरी : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.

Monday, October 7, 2013

न्युटनचा नियम

क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या.

सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं.

बिट्टू - सर , थोडासाच येतो मला.

सर - बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग.
.
.
.
.
.
बिट्टू - ..........म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम
म्हणतात.