Showing posts with label शिक्षक. Show all posts
Showing posts with label शिक्षक. Show all posts

Monday, February 10, 2025

बंड्याचा श्लोक

 बंड्याने संस्कृतच्या गुरुजींना विचारले : गुरुजी,

येन रूक नपाम्रधु !!. 

येन रूक नपाद्यम !!.

या श्लोकाचा अर्थ काय हो ??

गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला. 

अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.  

भरपूर मेहनत घेतली.  जंग जंग पछाडले,  

पण कुठेच काही शोध लागला नाही.

आता गुरुजी बंड्याला टाळू लागले .... एकदा तर चक्क ..त्याला बघून रस्ताही बदलला...

बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला ..

गुरुजी .. हतबल झाले ... शेवटी त्यांनी ....

७-८ दिवसांनी  बंड्यालाच विचारले,

"बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?

बंड्या गुरुजींना म्हणाला - 

"हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी..." 

गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले. 

तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवलं...,

गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला.......

बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. 

तिथं लिहीलं होतं

धूम्रपान करू नये !!. 

मद्यपान करू नये !!.

😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

Monday, April 13, 2020

झंप्या आणि गुरुजी

गुरूजी: पाण्याचे रेणुसुत्र काय ?
झंप्या: H2ch3n3hfbi5h6o8O
गुरूजी: चुक
झंप्या: सर हे गढूळाच पाणी आहे
गुरूजी सैरावैरा पळत आहे...

Wednesday, June 4, 2014

बबन्याची स्वप्ने

मास्तर ... बबन्या सांग पाहू तू मोठा झाल्यावर काय करणार ?
बबन्या ... लग्न .
मास्तर ... नाही रे बाळा मला म्हणायचंय की तू कोण बनणार ?
बबन्या ... नवरा .
मास्तर ... अरे मला असं म्हणायचंय की मोठा झाल्यावर तू काय मिळवणार ?
बबन्या ... बायको .
मास्तर ... अरे मुर्खा म्हणजे मोठा झाल्यावर आईबापासाठी काय करणार ?
बबन्या ... सून आननार .
मास्तर ... अरे रताळ्या तुझ्या बापाला तुझ्याकडून काय पाहिजे ?
बबन्या ... नातू .
मास्तर ... देवाऽऽऽऽ अरे भुसनळ्या तुझ्या जीवनात काय अपेक्षा आहेत तुझ्याकडून ?
बबन्या ... हम दो हमारे दो ....
मास्तर कोमात... बंड्या जोमात....

Friday, April 25, 2014

चम्प्या एकदा डॉक्टर कडे जातो..
चम्प्या - मास्तर
साठी चष्मा बनवायचाय....
डॉक्टर - पण का?
.
.
.
.
चम्प्या - त्यांना मी गाढव दिसतो...

Sunday, April 13, 2014

विश्वास

एकदा अभियांत्रिकी च्या सर्व
प्राध्यापकांना एका विमानात बसविले
जाते........
आणि नंतर घोषित केले जाते की ........
" या विमानाची निर्मिती आपल्याच
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली आहे."
तेव्हा सगळे प्राध्यापक भीतीने विमानातून
उतरले .... परंतु प्राचार्य आत बसून
राहिले ...
सर्व प्राध्यापक - " सर ,
तुम्हाला भीती नाही वाटत ?"
प्राचार्य - " बिलकुल नाही...
मला माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास
आहे ... "
. .
.
.
.
.
. .
.
" हे विमान चालूच होणार नाही ......."

Thursday, November 28, 2013

गुरुजींची ख़ुशी

गावातल्या शाळेतील चिडके शिक्षक वर्गात आले. नेहमीप्रमाणे त्यांनी टेबलावर डस्टर आपटले.
"शांत बसा", अशी गर्जना केली. वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले,
"मु ऽऽ लां ऽऽ नो, आज मी खूप खूप खुश आहे.सांगा बरे कशामुळे? "
पोरं एका सुरात म्हणाली, "सर कशामुळे?"
सर म्हणाले, "ओळखा पाहू?"
पोरे एका स्वरात म्हणाली, "आम्ही नाही, तुम्हीच सांगा."
सर आढेवेढे घेत म्हणाले," अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला."

पोरांनी टाळ्या वाजवल्या.खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला.
प्रश्न केला, "ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?"
पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली.

तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारटं बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं,

"खरवस...!!!"

Thursday, November 21, 2013

गाय

सरांनी वर्गात मुलांना सांगितलं
'' उद्या येताना 'गाय' या विषयावर निबंध लिहून आणा...''

मग वाचा आपल्या 'गणप्या' ने लिहलेला निबंध

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.

गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.

पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय!!!!

Wednesday, May 15, 2013

व्याकरण आणि गणित

गुरुजी: तुझं व्याकरण कच्चं आहे...
म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा
लिहून आणायला सांगितलं होतं...
पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस.
.
.
.
.
.
बंडू : माझं गणितही कच्चं आहे!!....