Wednesday, November 3, 2021

कटू सत्ये

 आयुष्यातील काही कटू सत्य ,

😃😃😃😃😃😃


       


१. चांगले काम करायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा..

मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची.. 


२. काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात.. 


३. काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..

फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.. 


४. चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य..

"माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 


५. तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..

ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..


६. मिसळ च्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला..

corona ची किंचित ही भीती नसते..


७. ज्यांच्या आयुष्यात कायमच्ं चढ उतार येतात..

त्यांना ट्रेकिंग ला जायची गरज नसते..


८. लग्नात.. मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही.. 


९. आज कालच्या पोरा पोरींपेक्षा, संस्कारी तर मच्छर आहेत..

सात च्या आतच्ं घरात येतात.. 


१०. ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते.. 


११. जिथे मारामारी करणं शक्य नाही..

तिथे टोमणे तरी मारूनच्ं यायचं.. सोडायचं नाही अजिबात.. 


१२. आयफोन वाल्यांच् अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं.. 


१३. वर्षभर DP न बदलणारे..जेव्हा २-२ दिवसात DP बदलतात..

तेव्हा समजून जायचं.. की कोणीतरी नवीन "जेवलास का ?" ADD झाली आहे.. 


१४. पोट आणि ego कमी असेल तर..

माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 


१५. गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना..

"तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?


१६. भिंतीलाही कान असतात म्हणणाऱ्यांनो..

तुम्ही ज्याच्यासोबत तुमचे सिक्रेट शेअर करता ना..

तोच खरा पोस्टमन असतो.. 


१७. तुम्हाला जर तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखादं दिवशी फरशी पुसून बघा.. 


ज्ञान स्थगित..


🤩🤩😎😎😎🤩🤩

Wednesday, September 29, 2021

सामान हलवणे

 शिफ्टिंग ला मराठीत काय म्हणतात ?


“सामान हलवणे” या शिवाय दुसरा पर्यायी मराठी शब्द नाही का? कोणी विचारल्यावर सांगितले तर लोक गैर अर्थ काढतात


याहूनही भयानक परिस्थिती...


बदली झाली की शेजारीण येऊन विचारते की

 "तुमचं सामान हलवताना काही मदत लागली तर संकोच न करता सांगा"


😂😂

Saturday, August 21, 2021

फसवणूक

आपण नेहमी सावध रहावे. आपली कशीही फसवणूक होवू शकते. कशी फसवणूक होते ते खालील व्हिडिओ पाहून समजून घ्या. 😊





Saturday, April 3, 2021

 जर आणखीन एक चार-पाच वर्षे असंच मास्क घालून फिरत राहिलो तर,

😷

😷

😷

😷

😷

😷

येणारी नवीन पिढी असेच समजेल कि

.

 नाक पण एक 'गुप्त' अंग आहे...

.

😃

Friday, April 2, 2021

प्राणी, मित्र-मैत्रीण

 *आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर*

*रूबाबाने आपल्याला इंग्लिश*

*बोलता येते हे*

दाखविण्यासाठी सुनिलने

घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले

आणि म्हणाला.....


'टेक टॉमी टेक'




टॉमी जाऊन भिंतीला टेकला.

....कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता.


टॉमी पुण्याचा आहे...


..😅😅😂😂

Monday, March 29, 2021

बिनसाखरेचा चहा

 : एकदा शरद पवार साहेब कडे 


उद्दव

राज

आठवले

फड़नवीस

अशोक चव्हाण


आले होते.....


चहाला साखर संपली होती. 

सौ.पवार म्हणाल्या

 साखर आणा..

पवार साहेब म्हणाले तू चहा तसाच  बनव, मी सांभाळतो.


बायकोने 6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.

: पवार साहेब चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाले 'एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही. ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ

चहा झाल्यावर सगळ्यांना  विचारले की कोण आहे तो ?


सगळे म्हणाले.. 


'साखर जास्त होती'

सगळे निघुन गेले 

😜😜😜😜😜😜

: पवार सौ कडे बघत हसत म्हणाले

याला म्हणतात 

👌 राजकारण 👌

थांबा विषय सम्पला नाही

पण पुढच्या रविवारी सर्वजण परत पवार साहेबांच्या घरी जेवणाला हजर झाले.

पवार साहेबांनी विचारलं माझ्याकडे कसं काय?

तर देवेंद्र फडणवीस म्हणाले , आमच्या सर्वांच्या चहामध्ये साखर खूप होती म्हणजे

: बिगर साखरेचा कप तुम्हालाच आला.

आता द्या जेवण😋😋😋

😜😜 आता पहिल्यासारखं राजकारण सोपं नाही राहिलं  पवार साहेब...😉😉😉

Friday, March 26, 2021

 *बायको :* आपला शेजारी बघा... 

किती रोमॅंटिकपणे आपल्या 

बायकोचं किती कौतुक करतो ते... 

फुलांचा सडा घालून तिला फुलांवर बसवतो तिच्या वाढदिवसाला.....

नाहीतर तुम्ही.....😏😩


नवरा: उगीच वाद नको घालूस,  

पस्तावशील....तुला माहित आहे ना, 

कि त्याचा व्यापार फुलांचा आहे 

आणि माझा व्यापार मिरच्यांचा...

करु का वाढदिवस साजरा..?


😜😂😜😜😆😆😆

🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

Saturday, March 13, 2021

 माझी तीन शब्दान्ची कविता


तो म्हणाला .....अं


ती म्हणाली.... हं

.

.

.

.

पण घरचे म्हणाले 


अं हं


🤣🤣🤣🤣🤣

Friday, March 12, 2021

 😂😜🤣😅👌👍

एक आमदार त्याच्या मतदार संघातील एक खेड्याला भेट देतो. गावकरी समस्यांचा पाढा वाचू लागतात. तेव्हा आमदार म्हणतात, "हे पहा, आता तुमच्या फक्त तातडीच्या दोन समस्या सांगा." आणि ते सरपंचाला उभे करून पहिली समस्या विचारतात. सरपंच सांगतात, "साहेब, इथे सरकारी दवाखाना तर आहे पण डॉक्टरच नाही, आणि..." ,त्याला मध्येच थांबवत आमदार म्हणतात, "थांब, घाई  नको, एका वेळी एकच" . आणि खसकन मोबाईल काढून एक नंबर लावतात आणि पलीकडच्या व्यक्तीशी शिव्यांच्या भाषेत ओरडून दम देतात, आणि फोन बंद करून गावकर्यांना सांगतात,"उद्याच तुमच्या गावात डॉक्टर येतील.आता सांग पुढची समस्या, तीही लगेच मार्गी लावतो". सरपंच म्हणतात, "साहेब,या गावात कोणत्याच मोबाईलला रेंज नाही.त्याचं काहीतरी करा"

 -भयाण शांतता...😂😂😂

Thursday, March 11, 2021

 मित्रांनो आज बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर यांचे कोरोना लस घेतानाचे स्टेटस पाहिले, हा आपल्या साठीच नव्हे तर आपल्या पूर्ण देशासाठी एक गौरवाचा क्षण आहे.


 येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना लस दिली जाणार आहे. पण ही लस घ्यायला जाताना एक अत्यंत आवश्यक गोष्ट करायला विसरू नका.


ती म्हणजे *तुमचा बनियन नवीन किंवा चांगला घाला*


कारण लस शर्ट काढून दंडात देणार आहेत.

बघा इज्जतीचा सवाल आहे.


काळजी घ्या, सतर्क रहा, नवी बनियन घाला. फाटका आणि भोक पडलेला  घालु नका. मिडियावाले लगेच फेमस करतील - फटीचर म्हणून मोफत लस दिली.


आमच्या कडे विविध ब्रँड्स चे , सर्व साईझ मधील हाताचे व बिनहाताचे 

पांढरे तसेच रंगीत बनियन मिळतील 

*गोपाळ होजियरी, पुणे*


😂😁🤣

: पुणे तेथें काय उणे

Monday, March 8, 2021

 एका अट्टल दारुड्याला प्रश्र्न

विचारला…


प्रश्न : तुमचे आवडते कवी कोण?


दारुडा – मंगेश पाडगावकर.


प्रश्न : अरे वा !!!…. त्यांची कोणती कविता आवडते ?


दारुडा : “झोपाळ्या वाचून झुलायचे”

🍺🍻🥃🍺🍻🥃


😂😂😂😂😂😂😂😂

Saturday, March 6, 2021

 💉 आत्ताच लस घेतली


       काही साईड इफेक्ट नाही


       फक्त जेंव्हा ते म्हणाले

       चार महिने दारू पिऊ नका

       ...................

       तेव्हा थोडं

       चक्कर आल्यासारखं झालं......


🤣😂😅😜😜

Monday, February 22, 2021

काँग्रेसने काय केले?

 संसदेत आज परत भाजपने विचारले, "70 वर्षात काँग्रेसने काय केलं?" 

तेवढ्यात पाठीमागून कोणतरी ओरडलं,


"अजिबात सांगु नका रे, नाहीतर हे राहिलंय ते पण विकून टाकेल.!"😀😝😂

Sunday, February 21, 2021

सुंदरतेचा पुजारी

 एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो... 

त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन... 


एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” 



ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे... 

दे दणादण !

😂😂😂