Saturday, August 31, 2013

हॉटेल

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून
तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्याववर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर
पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये
शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत
झाला . त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच
त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.

ही आहे देशाची परीस्थिती...

पहिला: जादुटोणा, मंत्रबिंत्र झूट असतं सगळं

दुसरा: ह्या, काहितरीच काय.... वेडा आहेस तू

पहिला: अरे, हो... ही बघ शास्त्रीय कारणं...

दुसरा: शास्त्र गेलं तेल लावत, आमचे बुवा म्हणतात की खरं असतं सगळं

पहिला: अरे ते फसवतायत तुला, जरा डोळे उघड

दुसरा: गपे, माझी 'डोळस' श्रद्धा आहे... आमचे बुवा तसे नाहित, सॉलिड पॉवरफुल आहेत...

पहिला: अरे बाबा, असं काही खरंच नसतं, ही घे काही कॉमन सेन्स ची कारणं...

दुसरा: कॉमन सेन्स गेला तेल लावत, आमचे बुवा म्हणतात की हे सगळं खरं असतं...

पहिला: अरे, खरंच हे सगळं थोतांड असतं... तुझ्या भल्यासाठीच सांगतो आहे....

दुसरा: माझं भलं करतोस काय.... थांब.... गोळ्याच घालतो तुला...

ही आहे देशाची परीस्थिती...

Friday, August 30, 2013

मोबाईल मेरीज ब्युरो

संस्थाचालक : आम्ही ' मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय …
.
.
.
लग्नस्थळासाठी 1 दाबा,
..........
.
.
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
.
.
.
लग्नासाठी 3 दाबा,
.
.
.
चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
.
.
.
संस्थाचालक : दुसऱ्या लग्नासाठी पहिलीचा गळा दाबा

Thursday, August 29, 2013

कॉपी की कॉफी

पक्या ; एक कॉफी केवढ्याला?
वेटर : पन्नास रुपये साहेब !
पक्या : गपे ! समोरच्या दुकानात पन्नास पैशाला आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वेटर : ते झेरॉक्सचं दुकान आहे !

Wednesday, August 28, 2013

बिल

जोक समजतोय का बघा.
८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता..
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
...
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते...
मी कशाला घराचा फोन वापरू...?
...
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय...
मी कशाला घराचा फोन वापरू...
...
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस??