Wednesday, September 18, 2013

बाथरूममधील अपघात

मंग्या भाऊची नात हॉस्पिटल मध्ये admit केली होती ,
संग्राम नाना भेटायला गेले आणि विचारले "काय झाले अचानक ?"
मंग्या भाऊ म्हणाले, "अरे सकाळी अंघोळ करताना अचानक चक्कर येऊन पडली बाथरूम मध्ये.........
.
.
.
.
.
.
.
बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या दिन्याचे लक्ष होते म्हणून नाहीतर आम्हाला कळलेच नसते लवकर"

Tuesday, September 17, 2013

छतगळती

झंप्याच्या डाईनिंग रूम
मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

Monday, September 16, 2013

दुधवाला

एक दूधवाला महापालिका इस्पितळात
शेवटच्या घटका मोजत
होता. डॉक्टर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत होते.
जवळ त्याची बायको आणि दोन मुले होती.
दूधवाला त्याना म्हणाला “ मी काही आता जगत नाही.
माझ्यामागे तुम्ही आपसात भांडू नका.
आपल्या घराजवळचे वीस
वाडे आणि चार चाळी मी बायकोला देतोय.
ती बंगल्यांची मोठी स्कीम मी मोठ्याला देतोय
आणि मेन
रोडचे तीन ऑफिस टॉवर धाकट्याला ठेवतोय. “
डॉक्टर चाट पडून म्हणाले “
याना महापालिका इस्पितळात
कशाला आणलेत ? तुम्ही तर चांगले श्रीमंत
दिसताय !” बायको कपाळावर हात मारत म्हणाली “
डोम्बल्याचे श्रीमंत !
अहो, दूध पोचवायच्या लाइन बद्दल बोलतायत ते !!!”

Sunday, September 15, 2013

योजना

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
.
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न
करीन. आणखी काय करणार?
.
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे
काही करशील ते योग्य क्रमाने कर,म्हणजे झालं!!!

Saturday, September 14, 2013

अकाउंट

एकदा चम्प्या बँकेत जातो..
चम्प्या - अबे ए !! मला अकाउंट उघडून
द्या...
बाई - जरा व्यवस्थित बोला सर..
चम्प्या - ए भवाने..व्यवस्थित
च्या आयचा घो...अकाउंट कोण
उघडणार..ते बोल.
बाई मेनेजर कडे कम्प्लेन करायला जाते..
मेनेजर - काय प्रॉबलेम आहे
तुझा..जरा इझ्झतीत बोल.
चम्प्या - इझ्झतीच्या आयचा घो..
मला २० करोड
ची लॉटरी लागलीये...अकौंटउघडणार
कोण ते बोला..
मेनेजर - सर तुम्ही आतमध्ये या ना..
आपण बसून बोलू कि..
या येडपट बाईच्या नादी नका लागू.