Monday, December 28, 2020

पांडबाची इच्छा

 साधू : तुला आयुष्यात काय हवं आहे?


पांडबा : पैशे.....


साधू : थोड्या वेळासाठी पैसे बाजूला ठेव.


पांडबा : बरं.


साधू : आता सांग तुला आयुष्यात काय हवं आहे?


पांडबा : ते बाजूला ठेवल्यालं पैशे......


😜😎🤣😝

Monday, December 21, 2020

डोळे हे जुलमी गडे


😂 😂 😝 😝 🙈 🙈

डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्टरने खालील पथ्ये सांगितली:😎 😎


डोळा मारायचा नाही 😜


कशावरही डोळा ठेवायचा नाही 🧐


डोळ्यात डोळा घालून पहायच नाही 😳


दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायला जायच नाही ?😎


वर डोळे करायचे नाहीत  🙄


दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचे नाही ?


नको तिथे डोळे भरून पहायचे नाही 😒


कानाडोळा करायचा नाही  🤨


डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत ?


डोळे वटरायचे नाहीत  😳


काळा चष्मा घालून वावरायचे 😎 म्हणजे आपल्या डोळ्यात काय आहे ते कोणाला समजणार नाही.


सर्वात महत्वाचे:  बायकोने डोळे वटारून पाहिले तर तीच्या डोळ्याला डोळा भीडवायचा नाही; परिणाम वाईट होऊ शकतात. पुन्हा ऑपरेशन 🤕 करण्याची वेळ अल्यास मी जबाबदार नाही. 


😢😭😨🤥🥴🙄

 माझे डोळे भरून आले.

Wednesday, December 16, 2020

Problem solve करण्याची पद्धत

 शिक्षकांनी फळ्यावर लिहिलं...


 36x + yx - 2/3yx + 3x (66y + 12x) b =0


मग ते शैल्याकडे वळले आणि म्हणाले,

"शैलेश, problem solve कर"


शैलेशने duster उचललं, फळा स्वच्छ पुसून काढला आणि म्हणाला, "Problem solved"


😆😆😆


आपल्या काही problems वर असंच solution हवं असत

आयुष्यात कधी कधी या शैल्यासारखे वागून पहा...


💪😝

हसलात तर कळवा

 हसलात तर कळवा


👇


😋😜😋😜😜😜😜😀😀


एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती.


आरती झाल्यावर माझ्या समोर आरतीची ताट आलं..


नमस्कार करुन मी  खिशातुन  १० रुपयांची फाटकी नोट काढुन त्या ताटात अशा प्रकारे ठेवली 

की कुणी पाहु नये.

गर्दी खुप होती,

त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला...


तेवढ्यात त्या गर्दीमध्ये माझ्या मागे उभ्या असलेल्या काकुंनी माझ्यापुढे २००० रु.ची नोट धरली....

मी ती नोट घेउन आरतीच्या ताटात टाकली.

ती २००० रु.ची नोट बघून आपण फक्त १० रुपयेच तेही फाटके आरतीच्या ताटात  टाकले, 

या गोष्टीची थोडी लाज पण वाटली आणि

त्या काकुंबद्दल चांगलाच  आदर वाटला, 

म्हणुन बाहेर जाताना मी त्यांना नमस्कार केला.

तशी त्या म्हणाल्या, "तुम्ही १० रूपयांची नोट काढताना तुमच्या खिशातुन  २००० रुपयांची नोट खाली पडली होती, 

ती तुम्हाला मी परत देत होते...!"


😀 🙏बोला सत्यनारायण महाराज की जय...!🙏 😄

Thursday, December 3, 2020

बायकोचा धाक

दोन 50-50₹ च्या नोटा देऊन बायकोनं सांगितलं, 

 "50चे मटार आणि 50चे बटाटे घेऊन या."

 काही वेळाने नवरा परत आला आणि म्हणाला, "यातली मटार आणायची नोट कुठली?"