Tuesday, September 30, 2014

कथा की विनोद?

बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला : उद्या येताना आईवडिलांची केलेली
एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या. प्रत्येकानी वर्गात उभे
राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे.
.
...दुसरे दिवशी प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले
कपडे, आईवडीलानी पै पै वाचवण्या साठी किती व कसे कष्टात दिवस काढले
त्याचे रसभरीत वर्णने केले ....
वर्गात सतत हुंदके, नाकाची सुरुसुर आणि दबलेल्या आवाजातील रडणे ऐकू येत होते
.
'मार्गारेट' एका कोपर्यात बसून ते सर्व नीट ऐकत होती. तिच्या चेहर्यावरती
कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या.
.
शेवटी ती एकटीच उरल्यावर बाईनी विचारले, मार्गारेट तू कोणती गोष्ट सांगणार आहेस ?
.
मार्गारेट म्हणाली, माझी आई फायटर विमानाची वैमानिक आहे, वडिलांनी मला
आईची शौर्य कथा सांगितली ...
.
बाई पटकन म्हणाल्या "हो ?! ... कोणती ग ... सांग सांग .. आम्हाला पण ऐकू दे"
.
आईची इराकच्या युद्धातील शौर्यकथा आहे.
.
"आई f16 विमानातून बगदाद वर मिसाईल वापरून हल्ला करत असताना, आखातात
होणाऱ्या वाळूच्या वादळामुळे F16 बिघडले ... मग काय आईला विमातून उडी
मारावीच लागली.
.
कोणत्याही फायटर वैमानिकाकडे पॅराशुट असतेच त्याशिवाय, एक पिस्तोल, एक
धारदार चाकू आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी एक व्हिस्कीची क्वार्टर
बाटली पण असते.
.
पॅराशुट वापरून उतरताना आईच्या लक्षात आले की ती जर का वेडीवाकडी जमिनीवर
पडली तर तिच्या खिशातील व्हिस्कीची बाटली फुटेल आणि काचा लागून ती जखमी
होईल आणि शत्रूच्या हातात सहज सापडेल.
.
तिने एक सेकंद सुद्धा वाया जावू न देता, हवेत असतानाच व्हिस्कीची बाटली
उघडून पिवून टाकली व जमिनीवर फेकली .... तिला असे वाटतंय की ती बाटली
ज्याच्या डोक्यावर पडली यो इराकी क्षणात मेला असे तिला तिच्या
दुर्बिणीतून दिसले.
.
पॅराशुट च्या साह्याने ती जमिनीवर उतरली तो नेमका इराकी सैनिकांचा अड्डा
होता ... तिला त्यातील सर्व २० इराकी सैनिकांनी तिला घेरले.
.
आईने डोळ्याची पापणी लवायच्या आधीच पिस्तोल मधून फायारिंग सुरु केले ....
आणि १५ इराकी सैनिक जागीच मारले.
पिस्तोल मधील गोळ्या संपल्या हे लक्षात आले पण उरलेले ५ जण तिच्यावर
धावून येत आहेत हे तिने बघितले. तिने क्षणाचाही विलंब न करता चाकू उघडला
आणि एकेकाला भोसाकायाला सुरवात केली.
व ४ जणाना यमसदनाला पाठवले .... चौथ्या इराक्यावर चाकू हल्ला करताना,
चाकू त्या इराक्याचा हाडाला लागल्याने, चाकू तुटला
.
मग आईने तिचे कराटेचे सर्व ज्ञान पणाला लावून शेवटच्या इराकी सैनिकावर
जोरदार हल्ला केला व त्याचा गळा दाबून जीव घेतला.
.
तिने तिथल्या एका कपाटातून इराकी ड्रेस घातला व तिथली एक मोटारसायकल
घेवून ती अमेरीकन बेस वर सुखरूप परत आली.
.
या शौर्याकरता तिला प्रेसिडेंट ने विशेष प्रशस्तीपत्रक व डबल बढती सुद्धा दिली ...
.
क्षणाच्या शांतते नंतर ५-६ मिनिटे, सर्व मुले टाळ्या वाजवत होती ....
.
पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर बाईनी विचारले .... मार्गारेट , यातून
तू काय धडा घे असे वडिलांनी सुचवले ?
.
मार्गारेत्नी इकडे तिकडे बघितले व हळू आवाजात म्हणाली ....
.
वडील म्हणाले....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको दारू प्यायली असेल तर तिच्या वाटेला जावू नये

आता बोला

अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात
आप्पा बळवंत चौकात येतो ...
रस्त्यावर एक पुस्तक पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
' ३० दिवसात इंजिनीअर बना '
किंमत फक्त २५ रु .

Saturday, September 27, 2014

बायको असावी तर अशी...

 पोलीस- (कार चालवणाऱ्या ला थांबवून) ‘काय राव. भर
चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’
तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो.. त्याची
पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला..
त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं. 
पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय.
तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते.
पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तो फुटून आठवडा झाला. पण
दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून!
त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं. 

पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्टपण लावलेला नाहीये.
तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो.
पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही.
तो- (पत्नीकडे खाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव. 

पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी?
पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच..... 


अशी पत्नी सगळ्यांना भेटाव _/\_ म्हणजे सगळ्याचं कसं कल्याण
होईल

Sunday, September 21, 2014

A new love story

एका आजी आजोबांनी ठरवलं कि तरुण पणाचे दिवस आठवून त्याच
नदीकाठी भेटूया जिथे आधीही गुपचूप भेटायचो....
दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळी आजोबा हातात गुलाबच फुल घेऊन
नदीकाठी जाऊन उभे राहिले....वाट पाहून दमले पण
आजी काही आली नाही...मग रागाच्या भरात ते घरी गेले
आणि आजीला विचारल "तू मला भेटायला का नाही आलीस?"...
आजी लाजत लाजत म्हणाली..."आईने येऊ दिल नाही".... 

Thursday, September 18, 2014

अत्र्यांचे उत्तर

अत्र्यांची कार बिघडली
म्हणून ते पायी पायी कामासाठी जात
होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
‘ काय अत्रे , आज पायी पायी, कार विकली की काय?’
अत्रे म्हणाले. ‘अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून गेल्या की काय..?

Sunday, September 14, 2014

निमित्त

बायको :
अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून, मग आता का पिताय???
नवरा:
अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ???

Friday, September 12, 2014

डान्स

संता मित्राच्या पार्टी मध्ये गेला होता, त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

Saturday, September 6, 2014

वही-पेन

पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
.
.
.
.
.
पेन्सिल म्हणते पेन ला माझ्या वर प्रेम करतोस
मग
.
.
.
.
.
.
.
.
.
वहीवर का लाईन मारतोस........!!


Wednesday, September 3, 2014

लग्नाचे अनुभव

नवीन-नवीन लग्न झालेल्या तीन
राज्यातल्या तीन स्त्रिया पिकनीक करता स्वित्झर्लंडला आलेल्या असतांना आपसात चर्चा करीत होत्या.
गुजराती पत्नी– सुहागरात को मैंने
पति से कहा, ,
झाड़ू, पोंछा, खाना पकाना,
कपड़े-बर्तन धोना,
ये सब मैं नहीं करूंगी।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की मशीनों के साथ दिखाई दिया।......
केरळी पत्नी – मैंने भी पति से
ऐसा ही कहा।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की नौकरानियों के साथ दिखाई दिया।.......
महाराष्ट्रीयन – मी पन आमच्या ह्यांना असंच म्हणाले होते....
पहिल्या दिवशी हे दिसले नाहीत....,
दुसऱ्या दिवशी ही नजरेस येईनात...,
तिसऱ्या दिवशी कुठं थोडी सूज कमी आल्यावर डाव्या डोळ्यानं अंधूक-अंधूक दिसायला लागलं...........