Friday, May 30, 2014

पैसे

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो


पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेंव्हा
मिठाई खावीशी वाटते
पैसे आल्यावर
मधुमेहा मुळे खाता येत नाही.

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥

Monday, May 26, 2014

बकरी

टीवी वाला एकदा एका शेतकर्याची मुलाखत घेत असतो ..
टीवी वाला : तुम्ही बकरीला काय खाऊ घालता??
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या
शेतकरी : गवत
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : गवतच.
टीवी वाला : तुम्ही बकरीला कुठे ठेवता ?
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या ?
शेतकरी : दारात
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : दारातच ..
टीवी वाला : तुम्ही बकर्यांना कशाने धुता ?
शेतकरी : कोणत्या काळ्या कि पांढर्या ?
टीवी वाला : पांढर्या ??
शेतकरी : पाण्याने फक्त ..
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : पाण्यानेच .
टीवी वाला (वैतागून ): तुम्ही दोन्ही बकर्या सारख्याच सांभाळता मग सारख का विचारता काळ्या कि पांढर्या ?
शेतकरी : कारण पांढरी बकरी माझी आहे ..
टीवी वाला : आणि काळी ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेतकरी : ती पण माझीच आहे .

Thursday, May 22, 2014

==गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==




1.एक टप्पा आऊट

2.जिंकेल तो पहिला


3.कट ला एक रन

4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा

5 .बॉल डायरेक्ट घरात गेला की आऊट

6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट

7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल आणायचा

8.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....अरे यार ट्रायल बॉल होता

9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच काढायचा...

काय छान दिवस होते राव ते..

Tuesday, May 20, 2014

कंजूष प्रेम

कंजूष लव्हर्स ची लव्ह स्टोरी
कंजूष मुलगा आणि मुलगी प्रेमात
पडतात....
त्यांना भेटायचं असतं...
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून
एक
नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू
वर
ये... मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये
पोहचतो...
मुलगी : एवढा उशीर का केलास???
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच
नाही मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...
मी घेतलं ते ओढून

Monday, May 19, 2014

मांजरीची पिल्ले

अति भयंकर पीजे
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत
होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे इतके एकसाथ मावणार
नाही"...
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली..
.
.
.
..
.
.
.
.
.
.
..
.
.
...
..
.....
म़ाऊ म़ाऊ

Friday, May 16, 2014

आता कसं वाटतंय

मुलगी पहायचा कार्यक्रम होता...
मुलगा : गाता येत का.???
मुलगी : हो...
मुलगा : गाऊन दाखव...
मुलगी : तो काय बाहेर वाळतोय...
मुलगा : ओ हो.... वाळू दे वाळू दे...
मुलगी घराबाहेर जाते आणि थोड्या वेळाने वाळू घेऊन येते ....
( बिचारा मुलगा 5 दिवस झाले कोमात आहे हो.)

Tuesday, May 13, 2014

प्रेमपत्र

एका लहान मुलाच प्रेम पत्र...
(आपल्यातल्या हि कोणीतरी..लहान
असताना पाठवल असेल असं.. कोणाला तरी.. )
प्रिय पिंकी ,
प्रेम पत्र
पाठवण्यास कारण कि, मला तू खूप आवडतेस. तू
पण
माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून
मला वाटते
मी पण तुला आवडत असेल. तर
गणिताच्या पेपरला मला मदत कर, तू रेड रीब्बन
नको लावत जाऊ. तुझ्या मागची मंदा त्यावर इंक
सोडते मग मला राग येतो. ती माझ्या घरा
शेजारी राहते, इंक चा बदला म्हणून
तिच्या घराची बेल वाजून पळून जातो. तू fair &
lovely लावत जा, आणखी गोरी दिसशील.
तुझ्या शेजारी गुड्डी आहे न ती तुझ्या हून
गोरी आहे पण मला तूच आवडतेस कारण
ती माझी पेन चोरते . पत्रचा राग आला तर
मला परत दे, सरना देऊ नकोस .

Sunday, May 11, 2014

दुधाची गरज

एका मुलीला चहा बनवायचा होता. ती किचन मधे गेली.
फ्रिज मधे पाहिले, तर दूध संपले होते.
मग काय....
तिने आपला गाउन उतरवला.
आणि.... 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि ड्रेस घालून ती दूध आणायला गेली.
विचार बदला देश बदलेल...

Thursday, May 8, 2014

दरोडा

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात
आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.
... डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......
डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्याआई च नाव
पण गंगुबाई होत
... डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?
म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे
लाडाने गंगुबाई म्हणतात..

Sunday, May 4, 2014

स्वप्न

प्रत्येक मुलीच्या आईचे स्वप्न असते कि,
तिच्या मुलीला चांगला मुलगा मिळावा...
आता तुम्हीच सांगा...
:
:
:
:
:
:
:
मी तरी कोणा-कोणाच्या आईचे
स्वप्न पुर्ण करु.... ??
हेही वाचा-  यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही

Saturday, May 3, 2014

अंडे

एक कोंबडी दुकानात जाऊन दुकानदाराला म्‍हणते- एक अंडे द्या.
दुकानदार- लाज वाटत नाही, स्‍वत: कोंबडी असून अंडे खरेदी करतेस?
कोंबडी- माझे पती मला म्‍हणाले की 3 रूपयांच्‍या अंड्यासाठी फिगर खराब करू नकोस.

Thursday, May 1, 2014

बदला

याला म्हणतात बदला घेणे..!!
.
.
.
.
पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला...!!
.
.
मग काय;
.
.
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतला आणि तिच्या कॉलनी मध्ये रिक्षा चालवूलागला,
.
आता ती रोज पप्पू ला थांबवते, आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो