Wednesday, September 25, 2013

शासन व्यवस्था

दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर
वाचणार्या बंड्याने
त्याच्या बाबांना विचारले " बाबा, शासन
व्यवस्था म्हणजे
काय हो ? "
" त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले,
" हे बघ ,
मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे
मी भांडवलदार ;
तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते
ठरवते
म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण
काम करते
ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व
तुझा लहान
भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं "
बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान
भाऊ
रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरुण
ओले
केल्यामुळे तो रडत होता.
बंड्या आईला ऊठवायला गेला.
ती गाढ झोपली असल्याने
तो मोलकरीणीला ऊठवायला गेला तर
तिच्या खोलीत
बंड्याचे बाबा झोपलेले होते.
सकाळी बाबांनी बंड्याला विचारले " काय
बंडोपंत,
कळली का लोकशाही ?"
बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार
कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार
गाढ
झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत
प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व
गोष्टींचा त्रास
सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो.....

Tuesday, September 24, 2013

एक गोष्ट

आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आंब्याच्या झाडाला आंबे लागतात ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वडाच्या झाडाला कधीच वडे लागत नाहीत..!!
समजलं काय ..??



Monday, September 23, 2013

मनकवडी मुले

जर मुलीँना मुलांच्या मनातल
ऐकता आलं असत तर.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर येता जाता मुलांना,,
कानाखाली बसल्या असत्या..

Sunday, September 22, 2013

रुमाल

एकदा मुलगी आणि मुलगा बस च्या प्रतीक्षेत उभी होती . बस आली आणि मुलीने आपली हुशारी दाखवत बस च्या खिडकीतून रुमाल सीट वर टाकून आपली सीट आरक्षित केली.

मुलाला राग आला आणि त्याने रुमाल उचलला आणि स्वता त्या सीट वर बसला.

मुलगी : हे मिस्टर, हा रुमाल या सीट वर मी टाकला टाकला हि माझी सीट आहे . उठा पटकन.

... मुलाने त्याचा रुमाल काढला आणि तिच्या डोक्यावर ठेवला.

मुलगा : हे घे, हा माझा रुमाल मी तुझ्या डोक्यावर ठेवला आता तू पण माझी आहेस.

मुलगा रॉक्स आणि मुलगी शोक्स.........

Saturday, September 21, 2013

ट्रॅफिक पोलिस

एक तरुण वेगाने बाइकचालवत असतो.

तेवढ्यात ट्रॅफिक पोलिस त्याला पकडतो आणि पावती बाहेर काढतो.

पोलिस : काय रे, नाव काय तुझं?
.
.
.
.
.
तरुण : त्रिकुलवट्टीथेक्केपरम्बील स्वामी.
.
.
पोलिस : (पावती पुस्तक बाजूला ठेवून) जा! परत वेगाने चालवू नको गाडी

Friday, September 20, 2013

जनहिताची कामे

आमदार साहेब तुम्ही खूप मोठे समाजसेवक आहात असे ऐकले आहे
आमदार : हो आहे ना.
प्रश्न : मग काय काय समाजहिताची कामे केली आहेत तुम्ही?
आमदार : गुडी पाडव्याची सर्वात मोठी गुडी माझीच असते, मकर संक्राती ला मी फुकट मध्ये पतंग वाटतो धारदार मांजा देतो. रक्षा बंधन ला तर माझा रेकोर्ड असतो. अख्या जगात कुणाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत. गणपतीला तर आमचा मंडप एवढा जबरदस्त असतो कि त्यामुळे पालिकेला दहा दिवस वाहतूक दुसरीकडे वळवन्याशिवाय पर्याय नसतो. एवढा फ़ेमस आमचा नवसाला पावणारा गणपती आहे. दही हंडी हा तर आमच्या हक्काचा दिवस भारतातील सर्वात मोठी दही हंडी मी लावतो. दहा थरांची….
प्रश्न : पण एवढी मोठी दहीहंडी ? जर कुनी जखमी झाल्यास अथवा मृत्युमुखी पडल्यास.
आमदार : आता एवढी मोठी रिस्क घ्यायची तर अशा घटना घडणारच तरी पण आम्ही सर्व गोविंदांची विमा सोय केली आहे.
प्रश्न : पण विम्याने हे नुकसान भरून निघू शकेल?
आमदार : आता तो त्यांचा प्रश्न आहे
प्रश्न : तुम्ही महिलांसाठी देखील हंडी बांधता असे ऐकले आहे
आमदार : हो ना, आम्ही त्याची खूप काळजी घेतो. महिला हंडी फोडायला वर चढले कि आमचे तरुण कार्यकर्ते त्यांच्या बचावासाठी चारही बाजूने रिंगण करून हात वर करून उभे असतात. कुणी पडले तर झेलायला. एकही भगिनी ला दुखापत होवू नये अशीच आमची यामागची भूमिका असते.
--- अरे वा साहेब तुम्ही तर ग्रेट आहात. बर आणखी काय काय कामे करता तुम्ही
आमदार : आमच्या विभागातील वीज नेहमी जायची त्यामुळे तेथील इंजिनियर ला काळे फासले, रस्त्याच्या कंत्राटदाराला मारहाण केली. त्यांच्या कर्मचार्यांना देखील चोप देवून अद्दल घडवली. गृहमंत्र्यांना बांगड्या पाठवल्या आदेशावरून
--- आणखी काय काय ?
आमदार : आणखी बरेच काही आहे जसे क्यारम स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा
अशी बरीच जनहिताची कामे करतो आम्ही

Thursday, September 19, 2013

मन्या शाळेत लेट

एकदम फाडू जोक। १००% जो हो जोक वाचेल तो हसणार।
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला,"सर
रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे
उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय
मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले, "सर देयर वॉज चिखली पिकेशन ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम. .हि मारिंग मी शींगडा मेड
मी लंगडा. सो आय कम लेट!

Wednesday, September 18, 2013

बाथरूममधील अपघात

मंग्या भाऊची नात हॉस्पिटल मध्ये admit केली होती ,
संग्राम नाना भेटायला गेले आणि विचारले "काय झाले अचानक ?"
मंग्या भाऊ म्हणाले, "अरे सकाळी अंघोळ करताना अचानक चक्कर येऊन पडली बाथरूम मध्ये.........
.
.
.
.
.
.
.
बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या दिन्याचे लक्ष होते म्हणून नाहीतर आम्हाला कळलेच नसते लवकर"

Tuesday, September 17, 2013

छतगळती

झंप्याच्या डाईनिंग रूम
मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

Monday, September 16, 2013

दुधवाला

एक दूधवाला महापालिका इस्पितळात
शेवटच्या घटका मोजत
होता. डॉक्टर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत होते.
जवळ त्याची बायको आणि दोन मुले होती.
दूधवाला त्याना म्हणाला “ मी काही आता जगत नाही.
माझ्यामागे तुम्ही आपसात भांडू नका.
आपल्या घराजवळचे वीस
वाडे आणि चार चाळी मी बायकोला देतोय.
ती बंगल्यांची मोठी स्कीम मी मोठ्याला देतोय
आणि मेन
रोडचे तीन ऑफिस टॉवर धाकट्याला ठेवतोय. “
डॉक्टर चाट पडून म्हणाले “
याना महापालिका इस्पितळात
कशाला आणलेत ? तुम्ही तर चांगले श्रीमंत
दिसताय !” बायको कपाळावर हात मारत म्हणाली “
डोम्बल्याचे श्रीमंत !
अहो, दूध पोचवायच्या लाइन बद्दल बोलतायत ते !!!”

Sunday, September 15, 2013

योजना

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
.
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न
करीन. आणखी काय करणार?
.
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे
काही करशील ते योग्य क्रमाने कर,म्हणजे झालं!!!

Saturday, September 14, 2013

अकाउंट

एकदा चम्प्या बँकेत जातो..
चम्प्या - अबे ए !! मला अकाउंट उघडून
द्या...
बाई - जरा व्यवस्थित बोला सर..
चम्प्या - ए भवाने..व्यवस्थित
च्या आयचा घो...अकाउंट कोण
उघडणार..ते बोल.
बाई मेनेजर कडे कम्प्लेन करायला जाते..
मेनेजर - काय प्रॉबलेम आहे
तुझा..जरा इझ्झतीत बोल.
चम्प्या - इझ्झतीच्या आयचा घो..
मला २० करोड
ची लॉटरी लागलीये...अकौंटउघडणार
कोण ते बोला..
मेनेजर - सर तुम्ही आतमध्ये या ना..
आपण बसून बोलू कि..
या येडपट बाईच्या नादी नका लागू.

Friday, September 13, 2013

वरदान

एकदा एक चेटकीण चिंगी ला भेटते..

चेटकीण - मी तुझ्या ३ इच्छा पूर्ण करेन..
पण लक्षात ठेव,तू जी इच्छा सांगितलीस
त्याच्या १० पट जास्त
तुझ्या नवर्याला (चम्प्याला) भेटेल..

चिंगी - मला १० करोड रुपये दे..
आणि चम्प्याला १ अब्ज रुपये भेटतात..

...चिंगी - मला सर्वात सुंदर बनव
आणि चम्प्या तिच्या १० पट जास्त सुंदरहोतो..
चिंगी - मला एक छोटा हार्ट अटक दे..
.
.
तात्पर्य - पोरी फार हुशार असतात..
(हा जोक मुलींसाठी समाप्त झाला आहे)
.
.
पण चम्प्याला तिच्या पेक्षा १० पट कमीछोटा हार्ट
अटक येतो..

Thursday, September 12, 2013

पेप्सी

"एकदा तीन मिञ बागेत फिरायलाजातात.
तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत, की ते “पेप्सी”घरीच विसरून आलेत..
म्हणून तिघांनी मिळून ठरवले की
वयाने सगळ्यात छोटा मिञ जाऊन “पेप्सी” घेऊन येईल...
.
.
छोटा मिञ : मी एका अटीवर जाईन, की मी परत येईपर्यंत
तुम्ही समोसे खाणार नाहीत.इतर दोघांनी लगेच होकार दिला.
.
.
२ तास झाले, छोटा मिञ नाही आला..
.
.
४ तास झाले, तरी छोटा मिञ नाही आला.
आता या दोघांना वाटले, की आता मात्र समोसे खायला हवेत.
म्हणून त्यांनी समोसा उचलण्यासाठी हात पुढे केला.
.
तेवढ्यात छोटा मिञ झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला,
“तुम्ही असं करणार असाल, तर मी नाही जाणार पेप्सी आणायला.”

Wednesday, September 11, 2013

हॅपी बर्थ

मंग्या सायकल वरून जात असतो..
आणि सायकल चे चाक म्हशीच्या शेनावरून जाते. जवळच काही मुली उभ्या असतात.
.
.
.
.
.
त्या मुलीनी टाळ्या वाजवल्या आणि म्हंटले,
"हॅपी बर्थ डे टू यु"
मंग्या थांबला आणि उत्तर दिले,
धन्यवाद ,फक्त टाळ्या वाजवून भागणार नाही,
तर केक पण तुम्हाला खावा लागेल..!!

Monday, September 9, 2013

डोळे आणि जग

प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं.....
.
.
.
.
तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो,,
.
.
.
.
.
.
जरा कर्वे रोड ला ट्राफिक आहे का बघ रे ..

Sunday, September 8, 2013

स्त्री

गुरूजी : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हाथ
असतो ह्या वाक्यात तुला काय समजले?
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : हेच की शिक्षण सोडून कुठल्यातरी मुलीला पटवले पाहिजे.. 

Saturday, September 7, 2013

बेशरम

मुलगी: तू फारच बेशरम आहेस.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
मुलगा: तो तर मी लहानपणापासूनच आहे. मी जन्माला येतानाच नागडा जन्माला आलो होतो.


Friday, September 6, 2013

आळस

मास्तर ने परीक्षा मध्ये चार पानांचा चा निबन्ध लिहायला दिला -

विषय -"आळस म्हणजे काय ?

आपल्या बंड्या ने ३ पाने कोरी सोडुन दिली आणि ४ पाणावर मोठ्या अक्षरात लिहिले - -

"यालाच म्हणतात आळस |"

Thursday, September 5, 2013

अनुत्तरीत प्रश्न

मजा येईल एकदा वाचा~
माणसाला सोडवता येणार नाही असा कुठलाच
प्रश्न असत नाही असे जॉन केनेडी साहेब म्हणून
गेले खर ,पण
असे काही प्रश्न असतात?
.
मराठी पेपर च्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपर
पेक्षा कमी का?
.
उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत
नाही?
.
एशियाड
मधला प्रवासी सध्या एसटीतल्या माणसांकडे
अश्या 'हुडूत' नजरे ने का बघतो?
.
तांबडा सिग्नल
पडलेला असतांना आपल्या मागचा वाहनवाला होर्न
का वाजवत असतो?
.
लहान बाळाशी बोलतांना मोठी माणसे बोबड
का बोलतात?
.
बशीत ओतून चहा प्यायला तर येडाच आहे
अशा नजरेन माणसे आपल्याकडे
का पाहतात?
.
मिच म्हणून तुमच्याशी संसार केला अशी प्रत्येक
बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते?
.
आपण हॉटेलात बसल्यावर
तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालाची फरशी
का साफ करायला घेतो?
.
तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला असे
मुलाखत देणारा प्रत्येक माणूस
प्रश्नकर्त्यालाका म्हणतो?
.
हॉटेलात इडली सांभारातली शेवग्याची शेंग
चमच्याने कशी खायची?
.
गँस वर दुध ठेवलंय ,जरा लक्ष द्या म्हणून
बायकोने सांगितल्यावर आपली नजर चुकवून दुध
ऊतू कसं जात?
.
दोन शेजाऱ्या खूप काम पडलयं असं म्हणत
दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलत
असतात?
.
अज्ञानात सुख असते असे म्हणतांना माणूस
ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?
.
प्रत्येक साबण स्त्रियांचे सौंदर्य
खुलवतो ,मग आजूबाजूच्या सर्व स्त्रिया सुंदर
का नाहीत?
.
जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर
हात फिरवायला बाईच का लागते?
.
अनुभवी डॉक्टर्सही 'practice' का करतात?
.
कॉम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्ट वर
का क्लिक करावे लागते?
.
आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर
लोक कशासाठी जन्मलेत?
.
जंगलमॅन टारझन ला दाढी कशी नव्हती?
.
गोल पिझ्झा नेहमी चौकोनी खोक्यात
का पाठवतात?
.
बांधकाम पूर्ण
झालेल्या इमारतीलाही बिल्डींग का म्हणतात?
.
फ्री गिफ्ट म्हणजे काय?कारण गिफ्ट
फ्रीच असतात ना??
तुमच्याकडे या प्रश्नाची उत्तर असतील तर
सांगा बरे...!

Wednesday, September 4, 2013

आता कसं वाटतंय

एकदा मक्या रेल्वे रुळा शेजारून चालला असतो !
त्याच्या शेजारून कॉलेज ची
मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा मक्या ला सतवायाचे ठरवतो !
तो मक्या ला विचारतो
हे काय आहे? (रुळ दाखवून )
मक्या : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या: खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या: मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या: माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो मक्या आता चिडला आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
मक्या : तुझी आई आहे

Tuesday, September 3, 2013

परीक्षा

एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले,
मि तिच्या घरी गेलो आणि बेल
वाजवली..तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले, ति पण
खूप सुंदर होती. ति हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट
आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही. मि एकटीच
आहे, आत या ना."
मि हसलो आणि माझ्या बाईक कडे परत
निघालो..तेव्हा तिचा पूर्ण परिवार बाहेर आला अन् ते
माझ्या चांगलेपणावर खुश झाले अन्
म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे.
.
.
.
.
..
.
...
आता मी काय सांगू त्यांना,
की,
मि माझी बाईक लॉक
करायला चाललो होतो म्हणून...!!.

Monday, September 2, 2013

मैत्री

एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले,
एक प्रेयसीला आणि एक मित्राला .....

"मी जातोय उत्तर लवकर द्या !!"
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले,
"तू कुठे जातोस? मी कामात आहे, नंतर भेटू.."
हे वाचून त्याला खूपच दुख झाल
.
.
दुसरे उत्तर मित्राचे आले,
" अबे कमीने थांब, एकटा कुठे चाललास,मी पण येतोय !!!"
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,
"आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले"

Sunday, September 1, 2013

तिकीट

एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात असतो
कंडक्टर :भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :मी तिकीट नाही घेत कधी
कंडक्टर घाबरला त्याने हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला

दुसर्या दिवशी
कंडक्टर :भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :पास आहे माझ्याकडे....