Friday, March 27, 2015

डॉक्टर: तु वेडा कसा झालास?? .
.
😎वेडा: मी एका विधवा
सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
मग मी त्या मुलीचा कोण 😧😦😕😯हेच कळेना ओ


डॉक्टर: ए... गप्प रे आता मी वेडा होईन.

Wednesday, March 18, 2015

कुक्कुटपालन केंद्र :-
तिथला कोंबडा म्हातारा झाला म्हणून मालक नवीन कोंबडा घेऊन येतो. हा नवीन कोंबडा आपला लालचुटुक तुरा आणि गिर्रेदार शेपटी घेऊन ऐटीत मानेवरची पिसं फुलवत आपलं नवीन साम्राज्य पाहत असतो. तेवढ्यात त्याला आधीचा म्हातारा कोंबडा दिसतो. नवीन कोंबडा एक जोरदार बांग देऊन जुन्या कोंबड्या कडे तुच्छतेने बघतो.
म्हातारा कोंबडा: जर स्वतःला एवढा डॉन समजत असशील तर माझ्याबरोबर धावायची शर्यत लाव.
तरुण कोंबडा: - अरे म्हाता-या, मी एका पायावर धावत पण तुला हरवू शकतो.
म्हातारा कोंबडा: - साहजिकच आहे. तरुण आहेस त्याचा गैरफायदा मिळणार तुला. मी तुझ्या वयाचा असतो तर तुझ्या नंतर ५ सेकंद धावायला सुरुवात करून सुद्धा तुला हरवलं असतं.
तरुण कोंबडा: - ठीक आहे मग. मी तुझ्या नंतर १० सेकंद धावायला सुरुवात करतो मग तर चालेल?
म्हातारा कोंबडा: ठीक आहे. मी इथून धावायला सुरवात करेन आणि १० सेकंदा नंतर तू धावायला लाग. तिथे लांब मालक बसलाय ना, मी तिथे पोचायच्या आधी जर तू माझ्या तु-याला चोचीने स्पर्श केलास तर तू जिंकलास. मग इथल्या सर्व कोंबड्यांवर तुझा हक्क.!!
तरुण कोंबडा: - ठीक आहे.
ठरल्याप्रमाणे शर्यत सुरु होते.
तरुण कोंबडा १० सेकंद उशिरा सुरुवात करून पण झपाट्याने अंतर कापून म्हाता-या कोंबड्या जवळ पोचतो. ..
अचानक म्हातारा कोंबडा कलकलाट करत अधिकच जोरात पळायला लागतो.
तरुण कोंबडा तिथे लक्ष न देता म्हाता-याच्या तु-याला चोच लावायला धडपडत असतो...
तो तु-याला स्पर्श करणार तेवढ्यात “ठो” आवाज होतो..
मालकाने गोळी मारून नवीन कोंबड्याला ठार मारलेले असते..!
मालक: “च्याम्मायला दोन आठवड्यामध्ये हा पाचवा “गे कोंबडा” निघालाय...!
कोंबडी सोडून खुशाल कोंबड्याच्या मागं लागलंय.!! नक्कीच कलियुग आलंय.”
😇😇😇
तात्पर्य: जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन कामाला लागाल तेव्हा तिथल्या जुन्या खोडांचा आदर करा. त्यांच्यापासून खूप काही शिकण्या सारखे असते. पण जर त्यांच्याशी पंगा घेतला तर तुम्हाला कळणारही नाही तुम्हाला कोणी आणि का मारलं ते.!!
याला म्हणतात राजकारण
हेही वाचा- यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही