Monday, February 10, 2025

बंड्याचा श्लोक

 बंड्याने संस्कृतच्या गुरुजींना विचारले : गुरुजी,

येन रूक नपाम्रधु !!. 

येन रूक नपाद्यम !!.

या श्लोकाचा अर्थ काय हो ??

गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला. 

अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.  

भरपूर मेहनत घेतली.  जंग जंग पछाडले,  

पण कुठेच काही शोध लागला नाही.

आता गुरुजी बंड्याला टाळू लागले .... एकदा तर चक्क ..त्याला बघून रस्ताही बदलला...

बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला ..

गुरुजी .. हतबल झाले ... शेवटी त्यांनी ....

७-८ दिवसांनी  बंड्यालाच विचारले,

"बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?

बंड्या गुरुजींना म्हणाला - 

"हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी..." 

गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले. 

तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवलं...,

गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला.......

बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. 

तिथं लिहीलं होतं

धूम्रपान करू नये !!. 

मद्यपान करू नये !!.

😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

No comments:

Post a Comment