मी एक सेवानिवृत्त आहे. पत्नीसह महिनाभर रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आमच्या तीनही मुलांची लग्ने झाली आहेत ते त्यांच्या कुटुंबियांसह दूरच्या शहरात राहतात. त्यामुळे गावी गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे जर चोर आमच्या घरात शिरला तर घराची तोडफोड होईल, दारे, बॅगा,कपाट घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास अधिक नुकसान करू शकेल अशी भीती होती.
…..म्हणून, मानवतेच्या दृष्टीकोनातून मी रोख दोन हजार रुपये रुमच्या मध्यभागी असलेल्या टेबलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि चोरासाठी एक चिठ्ठी ठेवली.
"प्रिय चोरसाहेब, मला वाईट वाटते की तुम्हाला धोके पत्करून उदरनिर्वाहासाठी रात्री इतके कष्ट करावे लागतात..
मी एक मध्यमवर्गीय सेवानिवृत्त आहे, आम्ही पेन्शनवर जगतो, आमच्या घरी रोख रक्कम व दागिने नाहीत. गल्लीतील सर्व घरांपैकी तुम्ही आमच्या गरीब घराला भेट दिलीत हे दुर्दैव आहे. तथापि, मला वाटते की तुमचा वेळ, शक्ती आणि मेहनत वाया गेली असेल.. त्यामुळे तुमच्या जोखमीच्या व्यवसायाचा आदर करून, मी तुमच्यासाठी रोख दोन हजार रुपये गिफ्ट म्हणून टेबलवर ठेवले आहेत. जर तुम्हाला भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये केक आणि दारुची बाटली ठेवली आहे.. त्याचा अवश्य आस्वाद घ्या आणि, तुम्हाला जर जोखीम घेऊन तुमची कमाई वाढवायची असेल तर मी काही महत्त्वाची माहिती देऊ शकतो..
समोरच्या उंच इमारतीत आठव्या मजल्यावर पुर्वी ऑटोरिक्षा चालक असलेला व आता सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक रहातो.
बी-विंगमध्ये सहाव्या मजल्यावर एका स्थानिक 'भाई' चा उजवा हात रहातो,
……….पाचव्या मजल्यावर विभाग-प्रमुखांचे घर आहे, आणि
……..चौथ्या मजल्यावर एक प्रख्यात हवाला डीलर…….
त्यांच्याकडे रोकड असते आणि चोरी झाल्यास पोलिसांकडे तक्रार न करण्याइतपत ते शहाणे आहेत, धन्यवाद व शुभेच्छा”
एका महिन्यानंतर, जेव्हा आम्ही घरी आलो, तेव्हा त्याच सेंटर टेबलवर एक लाख रुपये रोख, दोन दारुच्या बाटल्या आणि एक चिठ्ठी होती.
"माझ्या सेवानिवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद.. मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली. म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख व ब्लॅक लेबलच्या दोन बाटल्या ठेवल्या आहेत.
फ्रीजमध्ये चॉकलेट केक व विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स ठेवले आहेत. मला आशा आहे की भविष्यात माझ्या आर्थिक विकासासाठी तुम्ही अशाच फायदेशीर टिप्स मला देत राहाल, धन्यवाद … …."
😀
No comments:
Post a Comment