Saturday, September 27, 2014

बायको असावी तर अशी...

 पोलीस- (कार चालवणाऱ्या ला थांबवून) ‘काय राव. भर
चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’
तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो.. त्याची
पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला..
त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं. 
पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय.
तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते.
पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तो फुटून आठवडा झाला. पण
दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून!
त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं. 

पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्टपण लावलेला नाहीये.
तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो.
पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही.
तो- (पत्नीकडे खाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव. 

पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी?
पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच..... 


अशी पत्नी सगळ्यांना भेटाव _/\_ म्हणजे सगळ्याचं कसं कल्याण
होईल

No comments:

Post a Comment