Friday, July 25, 2014

डॉक्टरचे प्रेमपत्र


प्रिये,
तुला आलिंगन एक चमचा,
चुंबन तीन चमचे,
दिवसातून तिन वेळा, दोन्ही एकाच वेळी, खरं सांगू, हे लिहीताना माझी छाती इतकी धड्धडते आहे, की स्टेथॅस्कोपचे बोंडूक मी माझ्याच छातीला लावलेय !
तू माझ्या दवाखन्यात घुसलीस आणि म्हणालीस, "मी किनई एका डॉक्टर नवऱ्याच्या शोधात आहे, पण डॉक्टरला कुठला एवढा वेळ? म्हणून मीच एकेका डॉक्टरची व्हिजीट घेतीय. हे माझे कार्ड, पसंत पडले तर कॉन्टॅक्ट करा !"
झालं ! त्याच क्षणी तू माझ्या ह्रुदयाच्या डाव्या जवनीकेत जाऊन बसलीस. ह्रुदयाचा आकार थोडा वाढला आहे , रागावू नकोस, तुझ्या आकाराबद्दल मी बोलत नाहीये. त्या दिवसापासून माझी नाडी तुझ्या चालीप्रमाणे झोके देत चाललीय. माझ्या छतीच्या 'एक्स रे' त तुझीच छबी आलीय. स्टेथॅस्कोपमधुन तुझाच मंजुळ आवाज ऎकू येतो. मी तुला ह्रुदयाच्या तीन रुम किचन ब्लॉकमधे सुखात ठेवीन (ह्रुदयाला चारच कप्पे आहेत म्हणुन नाईलाज आहे) .
मग माझी होशील ना ?

No comments:

Post a Comment