Tuesday, January 29, 2013

पाहुणचार

पुणेरी पाहुणचार
एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात,
वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.
पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.
तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे
धरता की नाही?”
पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन
वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?
पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त
मेजवानी मिळणार.
पटकन म्हणतो, “म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न
धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.”
साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती.
उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.

No comments:

Post a Comment