खतरनाक उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.**
2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!**
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. वैदू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**
4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून **
5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.
6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!**
7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.*
*8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.**
9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
Sunday, December 29, 2013
Friday, December 27, 2013
कडक मिंदी
कडक मिंदी=मराठी+हिंदी..
रिक्षावाला - हां madam .. ये आ गया आपका "विठ्ठलनगर"..
बाई - अरे नई नई यहा नई.. वो आगे वो 'चिंचेका' झाड दिखता है ना
वहासें 'उजवीकडे वळके' थोडा आगे...
रिक्षावाला - अरे madam .. २०रु. मै यहा तक ही आता...
बाई - क्या आदमी हो... अरे कुछ 'माणुसकी' है की नही...
थोडा आगे छोडोंगे तो क्या 'झीझेंगा' क्या तुम्हारा रिक्षा..

Wednesday, December 25, 2013
झंप्याचे उत्तर
एक पोरगी झंप्याला बोलली
मला एक सांग
एखादी पोरगी चार मुलांबरोबर
फिरली तर लोकं
तिला चालू
समजतात ..बिघडलेली समजतात
पण तेच जर का एखाद्या मुलाने चार
मुली फिरवल्या तर
त्या मुलाला सर्वे जण हीरो समजतात..
असं का ?
झंप्या शांतपणे उत्तरला...
जर एखादे कुलप वेगवेगळ्या चाव्यांनी उघडल
तर ते कुलप
बिघडलय असे समजतात......
पण
जर का एखादी चावी अनेक कुलपं उघडत
असेल तर
त्या चावीला 'MASTER KEY'म्हणतात....
मला एक सांग
एखादी पोरगी चार मुलांबरोबर
फिरली तर लोकं
तिला चालू
समजतात ..बिघडलेली समजतात
पण तेच जर का एखाद्या मुलाने चार
मुली फिरवल्या तर
त्या मुलाला सर्वे जण हीरो समजतात..
असं का ?
झंप्या शांतपणे उत्तरला...
जर एखादे कुलप वेगवेगळ्या चाव्यांनी उघडल
तर ते कुलप
बिघडलय असे समजतात......
पण
जर का एखादी चावी अनेक कुलपं उघडत
असेल तर
त्या चावीला 'MASTER KEY'म्हणतात....
Monday, December 23, 2013
सिगारेट
सिगरेट चं एक मजेशीर सत्य...!!!
.
.
.
.
.
सिगरेट चा धूर नेहमी अश्याच व्यक्तीकडे
जातो जो सिगरेट ओढत नाही..
.
बरोबर ना???
.
.
.
.
.
सिगरेट चा धूर नेहमी अश्याच व्यक्तीकडे
जातो जो सिगरेट ओढत नाही..
.
बरोबर ना???
Saturday, December 21, 2013
सेल्सगर्ल
एक नवीन वॅक्युम क्लिनर सेल्सगर्ल
दरवाजा वाजवते....
..
संता ति काही बोलायच्या आत
दरवाजा उघडतो,
..
सेल्सगर्ल living room मध्येयेते
आणि गाईच्या शेणानी भरलेली पिशवी फरशीवर
मोकळी करते....
सेल्सगर्ल:" सर जर येत्या 3 मिनिटात मी हे
शेण ह्या पावरफुल vaccum cleaner ने साफ
नाही केले तर मी हे शेण खायला तय्यार आहे ..
..
संता:" तुम्हाला त्याच्याबरोबर Chilli Sauce
आवडेल का ??
..
सेल्सगर्ल:" का सर ??
.
.
संता :" कारण आत्ता लाईट गेलेली आहे

Thursday, December 19, 2013
लॉटरी
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.......
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात
दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १
लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
...तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

Tuesday, December 17, 2013
प्लास्टिक सर्जरी
स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक
सर्जरी करायची आहे,
साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
.
....
.
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक
आम्ही आणून दिले तर..?
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक
सर्जरी करायची आहे,
साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
.
....
.
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक
आम्ही आणून दिले तर..?
Sunday, December 15, 2013
मासेमारी
एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला.
बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला.
सापाला मला चाऊ न देता परत सोडण्यासाठी मी काय करावे यावर थोडा विचार केला आणि बाटलीतून थोडी रॉयल स्टॅग त्याच्या तोंडात ओतली.
सापाचे डोळे गरगरले आणि तो पाण्यात निघून गेला.
मग मी गळाला तो बेडूक लावून गळ पाण्यात टाकला. थोड्या वेळाने पायाशी हालचाल झाली म्हणून पाहिले तर
.
.
.
साप तोंडात दोन बेडूक धरून माझ्याकडे आशेने पहात होता..

Wednesday, December 11, 2013
कस्टमर केअरला फोन
झंप्या मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतो..
एक मुलगी फोन उचलते..
मुलगी : कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे..
मी आपली काय मदत करू शकते ?
झंप्या : तुम्ही माझ्याशी लग्न कराल ?
मुलगी : तुम्ही चुकीचा नंबर डायल केला आहे
झंप्या : नाही, मी बरोबर नंबर लावला आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कराल ?
मुलगी : नाही, मी लग्नात इंट्रेस्टेड नाही
झंप्या : मॅडम, ऐकून तर घ्या एकदा
मुलगी : नाही.. नाही.. सॉरी
झंप्या : लव्ह मेरेज कराल तर हनीमून SWITZERLAND मध्ये आणि अरेंज मेरेज तर PARIS ला
मुलगी : मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इंट्रेस्ट नाही, तुम्ही मला का ऑंफर देत आहात
झंप्या : मॅडम, आता तुम्हाला समजलं असेल आमचं दुखः, आम्हाला तुमच्या ऑंफर मध्ये कुठलाही इंट्रेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करून का त्रास देतात?

Monday, December 9, 2013
अंडे
एका कोंबडीने भारत-चिन बाँर्डर वर एक अंड दिल
.
.
दोन्ही देश त्या एका अंड्यासाठी भांडू लागले
शेवटी एक फैसला झाला की
.
जो देश दुसर्या देशाच्या मुलिंणा जास्तित जास्त किस करेल, ते अंड
त्या देशाचा
.
.
भारताकडून Emran Hashmi ला चिनमध्ये गेला आणि 20,000
मुलिला कीस करुन आला
.
.
चिन वाले excited होऊन :-
आता आमची बारी
.
.
भारत:- चल यार ते अंड तुच ठेव ..

Saturday, December 7, 2013
लॉटरी
एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर
या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते
पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू
काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला...

Thursday, December 5, 2013
किस
मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता,
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे..
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे..
Tuesday, December 3, 2013
खरंय ना?
परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?
हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.
" जरा दाखव कि "
...
आणि बऱ्याच वेळा ती दाखवतेही....
हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.
" जरा दाखव कि "
...
आणि बऱ्याच वेळा ती दाखवतेही....
Sunday, December 1, 2013
अनुप्रास
लेखकाचे नाव माहिती नाही पण ज्यांनी हा अनुप्रास अलंकाराचा प्रयोग केला आहे त्यांना मानाचा मुजरा ...........
अनुप्रासाचा कळस!...............
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये
‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर
केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!
कथासार -
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन, कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे!!

Subscribe to:
Posts (Atom)