Sunday, December 29, 2013

खतरनाक उखाणे

खतरनाक उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.**
2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!**
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. वैदू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**
4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून **
5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.
6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!**
7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.*
*8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.**
9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा… 

No comments:

Post a Comment