Sunday, January 5, 2014

सरकारी वकील आणि डिफेन्स चा वकील

फेरतपासणी करून करून कंटाळलेला सरकारी वकील आरोपीला म्हणाला : आता मी जे विचारीन त्याचं केवळ हो किंवा नाही, एवढच उत्तर दे.

खाल्ल्या मिठाला जागणारा बचाव पक्षाचा वकील: ऑब्जेक्षन माय लॉर्ड! सरकारी वकील माझ्या अशीलाला फसवू पाहत आहेत. काही प्रश्नांची उत्तरे केवळ हो किंवा नाही, अशी देता येत नाहीत.

सरकारी वकील: का नाही?

डिफेन्स चा वकील: असं असेल तर माझ्या २ प्रश्नांची उत्तरे द्या.

सरकारी वकील: विचारा.

डिफेन्स चा वकील:
१) तुम्ही अजुनही तुमच्या बायकोचा मार खाता? 

२) आजदेखील तुमच्या घरी तुम्हीच जेवण बनवता?

No comments:

Post a Comment