Sunday, May 19, 2013

कुत्रा, माकड आणि वाघ

एकदा एक कुत्रा जंगलात रस्ता विसरतो
आणि तिकडेच भटकत असतो
तेवढ्या समोरुन एक वाघ येतो
.
कुत्रा घाबरतो आता आपण मरणार
तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचते
तो
ज्या दिशेने वाघ येतोय त्या दिशेला पाठ करुन
उभा राहातो
आणि
... तोंडात एक हाड पकडतो आणि म्हणतो
"खरच यार वाघाला खायची मजाच वेगळीआहे अजुन एक
वाघ भेटला तर मजा येईल "
.
हे पाहुन वाघ घाबरतो त्याला वाटत कुत्रा खुपच
खतरनाक आहे
आणि तो उलट्या पावलाने परत जातो
.
वरती झाडावर बसलेला माकड हे सगळ पाहतो
त्याला एक कल्यना येते कि आपण वाघाला कुत्र्या बद्दल
सगळ काही सांगुया ज्यामुळे वाघासोबत
आपली मैत्री होईल आणि तो आपल्याला त्रास पण
नाही देणार
माकड पळत पळत वाघाकडे जातो
.
तेवढ्यात कुत्रा त्याला पाहातो त्याला वाटतं
काही तरी लोचा आहे
.
माकड वाघाला भेटतो आणि सगळ काही सांगतो
वाघ भडकतो आणि ठरवतो कुत्राचा खेळ संपवायचा
.
कुत्रा आता सावध होतो
.
समोरुन वाघ आणि त्याच्या पाठीवर बसलेला माकड
आपल्या दिशेने येत आहे
कुत्रा पुन्हा त्यांच्याकडे पाठ करुनदाताने हाड चावत
म्हणतो
.
"एक तास झाला, ह्या माकडाला वाघाला फसवून
आणायला पाठवला होता आजुन आला नाही."

1 comment: