Monday, May 20, 2013

भांडण


  1. टी व्ही समोर बसून
    उगाच चैनेल चाळत होतो
    बायकोने विचारले-
    टी व्ही वर काय आहे ?
    मी म्हणालो भरपूर धूळ!
    .........आणि भांडण जोरात सुरु झालं !
    लग्नाच्या वाढदिवशी
    गिफ्ट काय हवी ?
    विचारलं तेव्हां म्हणाली-
    अस काहीतरी हव...
    ... ...एक पासून शंभर पर्यंत
    तीन सेकंदात पळेल!
    मी वजन काटा दिला!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    रविवारी फिरायला जाऊयाका? विचारलं...
    मला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
    मी तिला पेट्रोलपंपावरनेलं !
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    आरशात प्रतिबिंब पाहून
    काळजीत पडून म्हणाली-
    काय मी भयंकर दिसतेय !!!
    तुमच मत काय आहे ?
    मी म्हणालो
    तुझा चष्म्याचा नंबर..
    परफेक्ट आहे!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    मी विचारलं -
    वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
    ती म्हणाली
    जेथे खूप दिवसात मी गेलेली नाही !
    मी तिला स्वयपाक घरात नेलं!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

No comments:

Post a Comment