Friday, September 20, 2013

जनहिताची कामे

आमदार साहेब तुम्ही खूप मोठे समाजसेवक आहात असे ऐकले आहे
आमदार : हो आहे ना.
प्रश्न : मग काय काय समाजहिताची कामे केली आहेत तुम्ही?
आमदार : गुडी पाडव्याची सर्वात मोठी गुडी माझीच असते, मकर संक्राती ला मी फुकट मध्ये पतंग वाटतो धारदार मांजा देतो. रक्षा बंधन ला तर माझा रेकोर्ड असतो. अख्या जगात कुणाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत. गणपतीला तर आमचा मंडप एवढा जबरदस्त असतो कि त्यामुळे पालिकेला दहा दिवस वाहतूक दुसरीकडे वळवन्याशिवाय पर्याय नसतो. एवढा फ़ेमस आमचा नवसाला पावणारा गणपती आहे. दही हंडी हा तर आमच्या हक्काचा दिवस भारतातील सर्वात मोठी दही हंडी मी लावतो. दहा थरांची….
प्रश्न : पण एवढी मोठी दहीहंडी ? जर कुनी जखमी झाल्यास अथवा मृत्युमुखी पडल्यास.
आमदार : आता एवढी मोठी रिस्क घ्यायची तर अशा घटना घडणारच तरी पण आम्ही सर्व गोविंदांची विमा सोय केली आहे.
प्रश्न : पण विम्याने हे नुकसान भरून निघू शकेल?
आमदार : आता तो त्यांचा प्रश्न आहे
प्रश्न : तुम्ही महिलांसाठी देखील हंडी बांधता असे ऐकले आहे
आमदार : हो ना, आम्ही त्याची खूप काळजी घेतो. महिला हंडी फोडायला वर चढले कि आमचे तरुण कार्यकर्ते त्यांच्या बचावासाठी चारही बाजूने रिंगण करून हात वर करून उभे असतात. कुणी पडले तर झेलायला. एकही भगिनी ला दुखापत होवू नये अशीच आमची यामागची भूमिका असते.
--- अरे वा साहेब तुम्ही तर ग्रेट आहात. बर आणखी काय काय कामे करता तुम्ही
आमदार : आमच्या विभागातील वीज नेहमी जायची त्यामुळे तेथील इंजिनियर ला काळे फासले, रस्त्याच्या कंत्राटदाराला मारहाण केली. त्यांच्या कर्मचार्यांना देखील चोप देवून अद्दल घडवली. गृहमंत्र्यांना बांगड्या पाठवल्या आदेशावरून
--- आणखी काय काय ?
आमदार : आणखी बरेच काही आहे जसे क्यारम स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा
अशी बरीच जनहिताची कामे करतो आम्ही

No comments:

Post a Comment