Tuesday, June 11, 2013

निबंध

एका मुलाने लिहिलेला 'गाय' या विषयावरील निबंध:
....
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय
असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने
माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध
पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
आमच्या शेजारी जोशी काकु रहतात.
बाबांना जोशी काकु आवडतात.
त्या दिसायला छान व
गाईसारख्या गरीब आहेत.
आईला त्या आवडत नाहि..ती म्हणते.
ती गाय तुम्हाला आवडते कारण
तुम्ही बैलोबा आहत.
पोळा हा बैलांचा सण आहे.
त्या सणाच्य दिवशी बाबा नवेकपडे
घालतात.
आई पुरणाची पोळी करते.
पोळयाला पोळी तशी बैलाला गाय .
गाईला माता म्हणतात
भारत माता की जय !!!!

No comments:

Post a Comment