Monday, June 17, 2013

पँट

एक लढाऊ-जहाज असते, लै भारी आणि लै मोठ्ठे असते, त्या जहाजाचा एक कप्तान असतो.
तो एकदा निवांत डेकवर शिग्रेट फुकत उभा असतो, तेवढ्यात एक खलाशी पळत पळत येतो आणि सांगतो " सर जी सर जी, लै मोठ्ठा शॉट झाला . दुश्मनांची ३ लढाऊ लहाजे आपल्यावर हमला करायला चालुन येत आहेत."
कप्तान शांपतणे शिग्रेट फेकतो व खलाशाला म्हणतो " त्यांच्यायला, एक काम कर माझी लाल रंगाची पँट घेऊन ये पटकन ...."
पँट येते, तो घालतो व तुंबळ युद्धाला सुरवात होते व ते मोठ्ठ्या शौर्याने लढुन युद्ध जिंकतात ...
खलाशी विचारतो " सर जी सर जी, तुम्ही लाल रंगाची पँट का मागवलीत ? "
कप्तान " कारण सरळ आहे, युद्धात मला जखम झाली अणि त्यातुन रक्त आले तर ते पँटच्या लाल रंगामुळे ओळखु येणार नाही व तुमचे धैर्य आणि हिंमत टिकुन राहिल ...."

पुन्हा थोडा वेळ जातो, कप्तान पुन्हा १ शिग्रेट पेटवतो ...
तोच खलाशी पुन्हा पळत पळत येतो व म्हणतो " तिच्यायला, आता दुश्मनांची ३ डझन जहाजे आपल्यावर चालुन येत आहेत".
कप्तान ह्यावेळी शिग्रेट फेकत नाही, शांतपणे ती संपवतो व म्हणतो " जा बरं पटकन माझी पिवळ्या रंगाची पँट घेऊन ये...."

No comments:

Post a Comment