Friday, June 7, 2013

शिकवण

एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण
दिली की
मोठ्यांचा आदर करायचा बसमध्ये गाडीत
बसलेला असताना
एखादे आजी किंवा आजोबा उभे असले तर
त्यांना बसायला जागा द्यायची.
एका दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने
पहिले
जवळच एक आजी उभ्या आहेत.
तसा तो मुलगा उठला व म्हणाला,
... "आजी बसा ना" आजी म्हणाल्या,"नको"
थोड्या वेळाने पुन्हा व म्हणतो,
"आजी बसा ना" आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा, तूच बस."
मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा आजीला विनवू
लागला "आजी बसा ना"
तशा आजी ओरडल्या, आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"
मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट
सांगितली. आई म्हणाली,
"तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत
असेल."
मुलगा म्हणाला, "नाही ग आई, मी दारात
नव्हतो बसलो."
आई विचारते, "मग कुठे बसला होतास."
मुलगा म्हणतो,
.
.
.
.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."

No comments:

Post a Comment