Saturday, June 8, 2013
घोर कलियुग…!
झंप्या उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो "बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "शेजारच्या सुनंदाच्या"
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने झंप्या परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "शेजारच्या नंदिनीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने झंप्या परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "पलीकडच्या आळीतल्या आनंदीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
.
.
झंप्या चिडून आईकडे जातो आणि सांगतो " आई, हे बाबा बघ ना, मी कुठल्याही पोरीच्या प्रेमात पडलो तरी मला सांगतात कि ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ. अशाने माझे लग्न कधी व्हायचे ?"
आई झंप्याला म्हणते "तू बिनधास्त कुणीही निवड आनंदी, नंदिनी, सुनंदा.... तो तुझा बाप नाहीये.."
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment